Kishor Gajbhiye IAS 
लोकसभा २०२४

Kishor Gajbhiye: रामटेकमध्ये काँग्रेसच्या अडचणीत वाढ! किशोर गजभिये अपक्ष लढणार

काँग्रेसच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीत. कारण रश्मी बर्वे या जात प्रमाणतपत्र पडताळणीत अपात्र ठरल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते असलेले किशोर गजभिये यांनी आपण याच मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचं तसेच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. (Kishore Gajbhiye will contest as an independent candidate in ramtek constituency)

माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना किशोर गजभिये म्हणाले, "रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. हा अर्ज आधिक स्विकृत झालेला आहे. यामध्ये निवडणूक चिन्हही मला मिळालं आहे. जे मुक्त चिन्ह आहेत त्यातील प्रेशर कुकर हे चिन्ह मला मिळालं आहे" (Latest Marathi News)

मला जिंकायचं आहे त्यामुळं कोणाला फटका बसतोय याची चिंता मी कशाला करु. मी सध्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. पण लवकरच देणार आहे. मी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी माझ्यावर दबाव होताच, त्यासाठी लोकांनी प्रयत्नही करुन पाहिले. पण यावर मी आत्ता जास्त भाष्य करणार नाही, असंही यावेळी गजभिये यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

गजभिये नाराज का?

किशोर गजभिये यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यांनी रश्मी बर्वे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. केदारांचा हट्ट काँग्रेसच्या नेत्यांनी पुरवल्यानं गजभिये यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला.

वंचित बहुजन आघाडीनं त्यांना उमेदवारी देण्याचं जाहीरसुद्धा केलं होतं. पण अचानक वंचितच्यावतीनं भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनीही उमेदवारी दाखल केली. त्यामुळं वंचितकडूनही गजभिये यांना डावलण्यात आलं. त्यामुळं त्यांनी आता अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या नावाला उघडपणे विरोध केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi यांची उपस्थिती; काँग्रेस प्रचाराचं रणशिंग फुंकणार! 'या' जिल्ह्यात पहिली रॅली काढणार

Palakkad Train Accident: केरळमध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू! पलक्कडमध्ये घडली भीषण घटना

Rohit Sharma च्या घरी नवा पाहुणा येणार! Ritika चा तो फोटो अन् समालोचक हर्षा भोगलेंचं ते विधान...

Sports Bulletin 2nd November : भारताची न्यूझीलंडविरूद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल ते भारताला ऑस्ट्रेलियात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागणार

Video : महाराष्ट्रातील 'या' मंदिरात चक्क वाटला जातोय नोटांचा प्रसाद! कुठंए हे मंदिर? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT