जालना (१८) : ‘मविआ’चा चेहरा कोण?
जालना मतदारसंघात सहा विधानसभा आहेत. यात जालना काँग्रेस, भोकरदन, बदनापूर भाजप तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण शिंदे गट शिवसेना व फुलंब्रीत भाजपचे वर्चस्व असून येथे या पक्षांचे आमदार आहेत.
१९९९ पासून भाजप विजयी होत असून ही काँग्रेसची जागा असतानाही ठाकरे गटाकडून या जागेसाठी प्रयत्न होत आहेत. त्यात काँग्रेसचे डॉ. संजय लाखे पाटील हे शिवसेना (ठाकरे गटात) गेले आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यास डॉ. लाखे पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते. परंतु, महायुतीचे पारडे जड आहे.
सद्य:स्थिती
मतदारसंघात भाजपचे वर्चस्व, रावसाहेब दानवे सलग पाच वेळा विजयी.
महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरे गटात जागेसाठी चढाओढ
भाजपकडून १९९९ पासून विजयी होत असलेले रावसाहेब दानवे यांना उमेदवारी
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होण्याची शक्यता
भाजपसाठी प्रबळ असा मतदारसंघ
जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम शक्य
हे प्रभावी मुद्दे
मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणाचा परिणाम होण्याची शक्यता
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून जालना, भोकरदन, बदनापूर शहरासह ग्रामीण भागात पाणी प्रश्न गंभीर.
सिडको, सिडी पार्क प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित.
ठाणे (२५) : शिंदेंच्या अस्तित्त्वाची लढाई
मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाची लढाई ही मानाची आणि अस्तित्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीने खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्याचे निश्चित केले आहे. दुसरीकडे भाजपने या मतदारसंघावर दावा केला असला तरी मुख्यमंत्री शिंदे यांनीही येथे महायुतीचा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेच्या एन्ट्रीमुळे कल्याण, ठाणे या दोन्ही मतदारसंघाचे गणित पुन्हा बदलण्याचीही शक्यता आहे. असे असले तरी एकंदरीत येथे विकासाचा मुद्दा नव्हे तर निष्ठा हा मुद्दा या निवडणुकीत गाजणार आहे.
सद्य:स्थिती
महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित मात्र महायुतीच्या उमेदवारासाठी खलबते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केला असला तरी भाजप अजूनही आग्रही
मतदारसंघात विजयश्री खेचून आणणारा उमेदवार देण्यावर भर
निवडणूक रिंगणात कोण मातब्बर उतरणार याकडे मतदारांचे लक्ष
निष्ठेचा मुद्दा निवडणुकीत गाजणार
हे प्रभावी मुद्दे
विकसित नवी मुंबई, कोंडीत हरवलेले ठाणे आणि पश्चिम पट्ट्याला जोडलेल्या मिरा- भाईंदरमुळे प्रत्येक ठिकाणच्या समस्या भिन्न.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारलेले प्रकल्प अजून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत
रखडलेली जलवाहतूक, मेट्रोची कामे.
सातारा (४५) : लढत दोन्ही ‘राष्ट्रवादी’तच?
सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. आजपर्यंत कराडचे दोन (दक्षिण व उत्तर) आणि पाटण हे तीन मतदारसंघच सातारा लोकसभेचा खासदार ठरवितात, असा अनुभव आहे. येथून जो उमेदवार सव्वा लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्य घेतो तोच सातारा लोकसभेवर निवडून येतो. हा आजपर्यंतचा पायंडा आहे. लढत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांत होणार की भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी होणार हा कळीचा मुद्दा आहे. अद्याप महायुती आणि मविआचे उमेदवार निश्चित झालेले नसल्यामुळे राजकीय संभ्रमावस्था कायम आहे.
सद्य:स्थिती
महायुतीकडून उदयनराजे भोसले इच्छुक
‘मविआ’चा उमेदवार अद्याप निश्चित नाही
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नितीन पाटील इच्छुक आहेत
भाजपने उदयनराजेंना उमेदवारी दिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काही मते शरद पवारांच्या उमेदवाराकडे जाण्याची शक्यता
शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ने कराड भागातील उमेदवार दिल्यास सातारा, वाई भागातील उमेदवाराला निवडणूक अडचणीची ठरणार
हे प्रभावी मुद्दे
मराठा आरक्षणाचा मुद्दा
औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आलेले नाहीत
बेरोजगार युवकांना पुणे, मुंबईची वाट धरावी लागते
दुष्काळी परिस्थितीकडे शासन व प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष
गडचिरोली-चिमूर (१२) : आदिवासी, ओबीसी गेमचेंजर
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर हे सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल असला तरी ओबीसींची संख्याही मोठीच आहे. रखडलेल्या विकासावरून आदिवासी नाराज आहेत, तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी संतप्त आहेत. त्यामुळे येथे भाजपला ही निवडणूक यंदा जड जाण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.
सद्य:स्थिती
भाजप आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर नाही
भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते यांचे नाव आघाडीवर, पण संघाकडून नवोदित डॉ. मिलिंद नरोटेंसाठी आग्रह
धर्मरावबाबा आत्राम यांचीही उमेदवारीसाठी धडपड.
महाविकास आघाडीकडून राज्यातून डॉ. नामदेव किरसान,तर केंद्राच्या पक्षश्रेष्ठींकडून डॉ. नामदेव उसेंडींना पसंती असल्याची चर्चा
हे प्रभावी मुद्दे
मतदारसंघातील रखडलेले सिंचन प्रकल्प आणि अन्य विकास कामे
संथगतीने चालणारा वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग
धानाला योग्य भाव, वनपट्टे
वैद्यकीय महाविद्यालय
खराब रस्त्यांचा गंभीर प्रश्न
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.