Kolhapur Lok Sabha Result esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : दुपारनंतरच होणार निकालाचे चित्र स्पष्ट; 'राधानगरी'त होणार सर्वाधिक 30 फेऱ्या, मतमोजणीसाठी 504 कर्मचारी

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान झाले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) तयारी सुरू करण्यात आली आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा (Kolhapur Lok Sabha Result) निकाल ४ जूनला लागणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी जवळपास ५०४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यामध्ये राधानगरी (Radhanagari) विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३० फेऱ्या होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान झाले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) तयारी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी २५२ व हातकणंगलेच्या मतमोजणीसाठी २५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक टेबलला पर्यवेक्षक, सहायक व सूक्ष्म निरीक्षक असे तीन कर्मचारी असणार आहेत.

मतमोजणीसाठी १४ टेबलवर विधानसभानिहाय फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यावेळी दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची संख्या भरपूर असल्याने मतमोजणीला गतनिवडणुकीपेक्षा यंदा अधिक वेळ लागण्याची चिन्हे आहेत. दुपारपर्यंत कल समजून सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाकडून मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याकरिता आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मतमोजणी संदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मतमोजणीची ठिकाणे निश्‍चित

मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून निवडणूक आयोगाकडे ठिकाणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. ते प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदाम येथे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी ही राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह अन्य बाबींचा समावेश आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल.

-समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

अशा होणार फेऱ्या (विधानसभा मतदारसंघनिहाय)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्रे फेऱ्या

  • चंदगड ३८१ २७

  • राधानगरी ४२५ ३०

  • कागल ३५४ २५

  • कोल्हापूर दक्षिण ३२८ २३

  • करवीर ३५७ २५

  • कोल्हापूर उत्तर ३११ २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT