Kolhapur Lok Sabha Election Results esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha Results : बालेकिल्ल्यांनी केला मंडलिकांचा घात; शाहू महाराजांना जिंकवत सतेज पाटील ठरले 'किंगमेकर'

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी करवीर, दक्षिण व उत्तरधून काँग्रेस उमेदवाराला मिळणाऱ्या मताधिक्याविषयी भीती व्यक्त केली होती.

सकाळ डिजिटल टीम

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाने जिल्ह्यात २५ वर्षांनंतर त्यांनी पक्षाचा खासदार निवडून आणला. त्यामुळे पक्षाच्या पातळीवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे त्यांनी लक्ष्य वेधले.

कोल्हापूर : ज्या विधानसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Election Results) उच्चांकी मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती, त्याच मतदारसंघांनी खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा घात केल्याचे निकालात स्पष्ट झाले. कागलसह चंदगड, राधानगरीतून मोठे मताधिक्य मिळेल आणि उर्वरित तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मिळालेले मताधिक्य कमी होईल, असा बांधलेला अंदाजही फोल ठरला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात करवीर, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, चंदगड, राधानगरी व कागल अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली, त्याचवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी करवीर, दक्षिण व उत्तरधून काँग्रेस उमेदवाराला मिळणाऱ्या मताधिक्याविषयी भीती व्यक्त केली होती.

पण या तीन मतदारसंघातील मताधिक्य चंदगड, कागल व राधानगरीतून भरून निघेल असा अंदाज बांधला जात होता. पण प्रत्यक्ष बालेकिल्ले समजले जाणाऱ्या या तीन मतदारसंघांनीच प्रा. मंडलिक यांना धोका दिल्याचे स्पष्ट झाले. कागल हा प्रा. मंडलिक यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१९ मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे विरोधात होते, तरीही त्यांना तब्बल ७१ हजार ४२७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे हे त्यांच्यासोबत होते, तरीही अपेक्षित मताधिक्य त्यांना मिळाले नाही.

२०१९ मध्ये चंदगडमधूनही प्रा. मंडलिक यांना ५० हजार १३१ मतांचे मताधिक्य होते, यावेळी तेवढे नसले तरी किमान २५ ते ३० हजाराचे मताधिक्य मिळेल अशी शक्यता होती, पण तीही फोल ठरली. राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश vआबिटकर, राष्ट्रवादीचे के. पी. पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे सोबत असूनही याही मतदारसंघात प्रा. मंडलिक यांचा भ्रमनिरास झाला. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून प्रा. मंडलिक यांना ३९ हजार २१५ मतांचे मताधिक्य होते.

तीन मतदारसंघात शाहू महाराजांना लीड

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रा. मंडलिक यांच्या मागे ताकद लावली होती. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी महाडिक यांना विरोध केला. त्यावेळी सहाही विधानसभा मतदारसंघात प्रा. मंडलिक यांना मताधिक्य होते. पण यावेळी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना करवीर, दक्षिण, उत्तर व राधानगरीतून चांगले मताधिक्य मिळाले.

सतेज पाटील ठरले ‘किंगमेकर’

कोल्हापूर : निवडणूक मग ती कोणतीही असो त्यात झोकून देऊन उतरण्याची तयारी, स्वतः उमेदवार समजून केल्या जाणाऱ्या जोडण्या, प्रचारापासून ते निकालापर्यंत सूक्ष्म नियोजन, जे करायचे ते मनापासून आणि ताकदीने करण्याची हातोटी, हातात असलेली मोठी यंत्रणा, त्याच्या जोडीला आर्थिक ताकद यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ ठरले आहेत.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाने जिल्ह्यात २५ वर्षांनंतर त्यांनी पक्षाचा खासदार निवडून आणला. त्यामुळे पक्षाच्या पातळीवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे त्यांनी लक्ष्य वेधले असून, त्यातून त्यांना पक्षात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांनी २००४ मध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांची उठबस माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत होती, पण महापालिकेच्या राजकारणात या दोघांत मतभेद झाले, त्यातून निर्माण झालेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत गेला. त्याची परिणती महाडिक विरुद्ध पाटील या राजकीय वैरात झाली.

त्याची पहिली झलक २००९ मध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये पाटील यांच्याविरोधात खासदार धनंजय महाडिक यांच्या लढाईने झाली. गेली १५ वर्षे या दोघांत राजकीय वाद आहे, त्याचे पडसाद आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांत कमी-अधिक प्रमाणात उमटत गेले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संभाजीराजे अनपेक्षितरीत्या पराभूत झाले होते. हा पराभव छत्रपती घराण्याइतकाच सतेज पाटील यांच्या जिव्हारी लागला होता.

या निवडणुकीनंतर छत्रपती घराणेही राजकारणापासून काहीसे अलिप्तच होते, पण राज्यात राष्ट्रवादी व शिवसेना फुटली, तेव्हापासूनच कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते; पण उमेदवार कोण, याविषयी मोठी उत्सुकता होती. अलीकडच्या काही घडामोडी पाहता शाहू महाराज हे उमेदवार निश्‍चित होते. पाटील यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला तर घेतलीच, पण शाहू महाराजांना रिंगणात उतरून या घराण्यावर १५ वर्षांनंतर गुलाल उधळण्याची संधी प्राप्त करून देऊन त्यांनी आपला करिष्मा दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT