Satara Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : कऱ्हाड, पाटणचे नेते मुंबईत तळ ठोकून; सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरून खलबते

सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली नाही.

हेमंत पवार

सातारा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

कऱ्हाड : सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यावरून मोठा ट्विस्‍ट निर्माण झाला आहे. उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर होतील, अशी चिन्हे आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील कऱ्हाड-पाटण (Karad-Patan) तालुक्यातील नेते कालपासूनच मुंबईत तळ ठोकून आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील दिग्गजांची फळी असूनही पक्षात फूट पडल्यामुळे उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीला उभे राहण्यास नकार दिला. त्यामुळे पहिल्यांदाच सातारा लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्यासाठी खासदार शरद पवार यांना साताऱ्यात यावे लागले.

त्यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे पुढे आली. मात्र, राष्ट्रवादीच्या बालेकिल्‍ल्‍याची उमेदवारी कोणाला द्यायची? हे अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा झाली होती. यामध्ये पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सातारा लोकसभा तुतारीच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला.

हा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांनी नाकारला; पण ते काँग्रेसच्या चिन्हावर सातारा लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आता इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी सुरू केली आहे, तर खासदार श्रीनिवास पाटील यांनाच यावेळेसही उमेदवारी द्यावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावरून मार्ग काढण्यासाठी खासदार पवारांनीही वेळ घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या या सर्व घडामोडींसाठी कऱ्हाड-पाटण तालुक्यातील नेते कालपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. देसाई, पाटीलही मुंबईतच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ज्याचा सिटिंग खासदार, त्याची ती जागा या सूत्रानुसार साताऱ्याची जागा आमची असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे साताऱ्याची उमेदवारी अजित पवार गटाला मिळणार की भाजपला, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सातारा लोकसभेची भाजपची उमेदवारी खासदार उदयनराजे भोसले यांना द्यावी, या मागणीसाठी त्यांचे समर्थक आक्रमक आहेत. खासदार भोसले यांनी त्यासाठी दिल्लीवारीही केली आहे. मात्र, अद्याप पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही, तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी द्यावी, अशीही मागणी होत आहे. महायुतीतील शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई हेही दोन दिवसांपासून मुंबईतच तळ ठोकून आहेत. त्यांच्याकडूनही ते पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT