Lok Sabha 2024 esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha 2024: शिंदे गट संभाजीनगर पाठोपाठ नाशिक व ठाणे ही ताब्यात घेणार?

Lok Sabha 2024: गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेमक्या किती जागा लढवणार यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने मंत्री संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ नाशिक व ठाणेही शिवसेना ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिकमधून माघार घेतल्याने येथील जागेचाही प्रश्न सुटल्यात जमा आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेमक्या किती जागा लढवणार यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, पक्ष ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जागा लढवणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट सांगत आहेत. त्यामुळे शिवसेना राज्यात एकूण १३ जागा लढवणार असल्याचे समजत आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक या हक्काच्या जागांसाठी शिंदेच्या शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र, कालच शिवसेना नेते व मंत्री संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचा संभ्रम बऱ्यापैकी दूर झाला आहे. त्यातच आता प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाणे व नाशिक या दोन्ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये ही विश्वास निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT