Vishwjeet Kadam_Vishal Patil  
लोकसभा २०२४

Vishwajeet Kadam, Vishal Patil : सांगलीच्या जागेवर शिवसेनेचं शिक्कामोर्तब; विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरिचेबल?

सांगलीची जागा हातून गेल्यानंतर स्थानिक नेते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : सांगली लोकसभेच्या जागेवर आज महाविकास आघाडीतून अखेर शिक्कामोर्तब झालं असून शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीच अंतिम ठरली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे नॉटरिचेबल झाले आहेत. सहाजिकच सांगलीची जागा हातून गेल्यानंतर ते नाराज असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (Lok sabha electio 2024 Shiv Sena final on Sangli seat Vishwajit Kadam Vishal Patil Not Reachable)

सांगलीतून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. विशाल पाटील यांनी त्यासाठी गेल्या पाच वर्षापासून पूर्ण तयारी सुरु केली होती. शेवटपर्यंत त्यांना खात्री होती की सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल. पण आजच्या पत्रकार परिषदेत ही जागा अखेर शिवनेला जाहीर झाली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, काँग्रेसच्या नाराजीवर बोलताना आमदार विक्रम सावंत म्हणाले, "ही जागा खरंतर काँग्रेसलाच मिळायला पाहिजे होती. पण राज्यातील नेते आणि देशातील नेत्याकडं वारंवार मागणी करत होतो. पण आजची परिस्थिती झाली ते दुर्देवी आहे. (Marathi Tajya Batmya)

पण आजचा निर्णय हा भाजपच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी झाला का? अशी शंका येते. आम्ही उद्या एक बैठक घेऊन यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन प्रत्येक तालुक्याचा दौऱा करुन त्यानंतर पुढची योग्य ती दिशा ठरवणार आहोत. भाजपत प्रवेश करण्याचा संबंधच नाही. आमच्या काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT