शिरोळ : लोकसभा निवडणुकीची हवा आता महाराष्ट्रात चांगलीच तापायला लागली आहे. अनेक दिग्गजांना फटका बसणार असल्याचं एकूणच सकाळच्या निवडणूक दौऱ्यातून दिसून येत आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि हातकणंगले मतदारसंघातील लोकसभेचे अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांचाही समावेश आहे.
कारण राजू शेट्टींना आपल्या शिरोळ या गावातूनच नागरिकांच्या मोठ्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. आपल्या नाराजीची कारणंही शिरोळकरांनी सांगितली आहे. (Lok Sabha Election 2024 Hatkangale Raju Shetti Satyajeet Patil Dhairyashil Mane BB Patil)
हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील आहेत. त्यात अपक्ष म्हणून राजू शेट्टी आहेत तर वंचितकडून बी बी पाटील हे तगडे उमेदवार आहेत. त्यामुळं राजू शेट्टींसाठी ही निवडणूक सोपी नाही. (Marathi Tajya Batmya)
शिरोळच्या नागरिकांमध्ये का आहे नाराजी?
ई सकाळच्या प्रतिनिधींशी बोलताना इथल्या नागरिकांनी सांगितलं की, इचलकरंजीचा पाणी प्रश्न अजूनही सोडवण्यात माने आणि शेट्टी यांना अपयश आलं आहे. राजू शेट्टी ऊस सोडून कोणतंच आंदोलन करत नाहीत. शिरोळकरांनी राजू शेट्टींना दोनवेळा खासदार केलं पण त्यांनी स्थानिक प्रश्न सोडवलेले नाहीत. फक्त शेतकरी नेते आहेत म्हणून इतर प्रश्न बघायचे नाहीत असं नाही, काही नागरिकांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
तर केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळं शेतकऱ्यांच्या हातात काही मिळत नाही. त्यामुळं केंद्राच्या विरोधात नागरिकांची नाराजी आहे. त्याचबरोबर दुसरे पक्ष फोडायचे आणि चारशे पार म्हणायचं हा अंडरकरंट लोकांमध्ये आहे त्यामुळं आम्हाला बदल हवा आहे.
शेतकऱ्यांची अवस्था वाईट, महागाई, रोजगारीमुळं सर्वकाही बरबाद झालं आहे. मोदीजी म्हणतात अच्छेदिन येणार पण हे अच्छे दिन कधी येणार हे आम्हाला कळत नाही, असंही एका शेतकऱ्यानं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.