Jalgaon 
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: जळगावमध्ये अपक्ष आमदाराचा स्वतः एकट्यानंचं प्रचार सुरु; व्हिडिओ व्हायरल

Amit Ujagare (अमित उजागरे)

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे आता पार पडलेत यामध्ये जवळपास अर्धी निवडणूक संपली आहे. यानंतर आता चार टप्पे बाकी आहेत त्यात उरलेल्या अर्ध्या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान होतंय. पण या मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (Lok Sabha Election 2024 Independent MLA of Jalgaon starts campaign alone video went viral)

व्हिडिओ काय आहे?

जळगाव लोकसभा मतदारसंघातील आमदार ललित ऊर्फ बंटी शर्मा हे स्वतःचा प्रचार एकट्यानंच करत आहेत. लोकांमध्ये जाऊन हातात स्पिकर घेऊन तसेच दुसऱ्या हातात स्वतःच नाव, चिन्ह क्रमांका असलेला फलक घेऊन ते जनतेला आपल्यालाच मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. मार्केटमध्ये तसेच रहदारीच्या रस्त्यावर उभं राहून भर उन्हात त्यांचा प्रचार सुरु आहे.

त्यांच्या या प्रचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला त्यांच्याप्रती कणवही वाटू शकते, पण दुसरीकडं आपल्या निवडणूक प्रक्रियेचा भेसूर चेहरा देखील समोर येतो. कारण जर तुमच्याकडं भरपूर पैसा, संघटन असेल तरच तुम्ही निवडणूक लढवू शकता अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळेच ललित शर्मांचा एकट्यानं सुरु असलेला प्रचार बरंच काही सांगून जातो.

प्रचार काय सुरु?

हातातील स्पीकरवरुन ललित शर्मा यांचा प्रचार सुरु आहे. यात ते म्हणतात क्रमांक तेरा.. तेरा.. तेरा.. निशाणी आहे बॅट.. बॅट.. बॅट....जळगावचा एक सामान्य व्यक्ती....जय महाराष्ट्र! जळगाव शहरातील विविध भागात शर्मा यांचा हा प्रचार सुरु आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ विरुद्ध उद्धव सेनेचे करण पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अपक्ष म्हणून इथं ललित ऊर्फ बंटी शर्मा हे देखील उभे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT