Lok Sabha Election 2024 : देशभरातील ८९ मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 64.70 टक्के मतदान झालं. तर यांपैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात 53.71 टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. (Lok Sabha Election 2024 second phase election turnout in India 64.70 and Maharashtra turnout 53.71)
देशातील १३ राज्यांमध्ये एकूण ८९ मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पार पडलं. यासाठी १६ कोटी मतदार पात्र होते, पण त्यांपैकी सुमारे ९ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९ मतदारसंघ हे अनुसुचित जातीसाठी तर ७ मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव होते. (Latest Marathi News)
यामध्ये केरळमधील सर्व २० मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. तर महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील मतदान संपलं. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आसाममधील ५, बिहारमधील ५, छत्तीसगडमधील ३, कर्नाटकातील १४, मध्यप्रदेशातील ७, महाराष्ट्रात ८, मणिपूरमध्ये १, राजस्थानात १३, त्रिपुरात १, उत्तर प्रदेशात ८, पश्चिम बंगालमध्ये ३ आणि जम्मू व काश्मीर या राज्यात १ मतदारसंघात आज मतदान पार पडलं. (Marathi Tajya Batmya)
'या' चर्चेतील मतदारांचं भवितव्य झालं ईव्हीएममध्ये कैद
दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानामुळं प्रकाश आंबेडकर (अकोला), रवी राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा) यांच्यासह देशभरात ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, एच. डी. कुमारस्वामी, शशी थरूर, भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे.
महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात इतके टक्के झालं मतदान
वर्धा - ५६.६६ टक्के
वाशिम-यवतमाळ - ५४.०४ टक्के
अमरावती - ५४.५० टक्के
अकोला - ५२.४९ टक्के
बुलडाणा - ५२.८८ टक्के
हिंगोली - ५२.०२ टक्के
परभणी - ५३.७९ टक्के
नांदेड - ५३.५३ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.