Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : मताधिक्य राखण्याचे दिग्गजांपुढे आव्हान ; दहापैकी सात जागांवर मिळाला होता लाखो मतांनी विजय

सकाळ वृत्तसेवा

अनिल यादव : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता फुल्ल रंगात आला आहे. एकूण सात टप्‍प्यात होणाऱ्या निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून विदर्भातील दहा जागांवर मतदान पार पडले. ही निवडणूक खऱ्या अर्थाने दिग्गज उमेदवारांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. कारण, २०१९ च्या निवडणुकीत विदर्भातील दहापैकी सात जागांवरील उमेदवार लाखो मतांनी विजयी झाले होते. कुठे दोन तर कुठे पाचवेळा निवडून आलेल्या उमेदवारांमुढे मताधिक्य कायम राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला पराभवाची धूळ चारली होती. २०१४ मध्ये तर मोदी लाट एवढी तीव्र होती की विदर्भातील सर्वच्या सर्व दहा जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. दहापैकी भाजप सहा तर शिवसेना चार जागांवर विजयी ठरली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा गमावली.

अमरावती, चंद्रपुरातील निकालांनी धक्का

२०१९ मध्ये भाजपला चंद्रपुरात, तर शिवसेनेला अमरावतीत पराभवाचा धक्का बसला. मूळचे शिवसेनेचे आणि नंतर काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा ४४,७६३ मतांनी पराभव केला, तर अमरावतीत अपक्ष नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा ३६,९५१ मतांनी पराभव केला. देशभरात मोदी लाट असताना आणि भाजपला ३०२ जागा मिळाल्या असताना अमरावती आणि चंद्रपूर येथील मतदारांनी युतीच्या उमेदवारांना हिसका दाखविला.

दलित, मुस्लिम मते ठरवतील विजयाचे गणित!

चंद्रपूर-चिमूर, गडचिरोली, वर्धा वगळता अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम व नागपूर मतदारसंघांत मुस्लिम व दलित मते निकालावर परिणाम करणारे आहे. भंडारा-गोंदिया, रामटेकला दलित मतदार ज्याला एकगठ्ठा मतदान करतील त्याचा विजय पक्का समजला जात आहे.

शिवसेनेबाबतची राजकीय अस्पृश्यता संपली?

२०२४ ही निवडणूक राजकीय अस्पृश्यता संपविणारी ठरली आहे. खरे, तर याची सुरुवात अडीच वर्षांपूर्वीच झाली. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र येतील, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. काँग्रेससाठी शिवसेना म्हणजे राजकीयदृष्ट्या अस्पृश्य राजकीय पक्ष होता. पण, आज राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे सारथ्य करीत आहेत. विशेष म्हणजे आज मुस्लिम आणि दलितांनाही उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवलेले मतदारसंघ, पक्ष व उमेदवार

मतदारसंघ पक्ष उमेदवार २०१९ २०१४

  • नागपूर-भाजप-नितीन गडकरी-२,१६,००९-२,८४,८२८

  • रामटेक-शिवसेना-कृपाल तुमाने-१,२६,७८३-१,७५,७९१

  • वर्धा भाजप-रामदास तडस--१,८७,१९१ -२,१५,७८३

  • भंडारा-गोंदिया-भाजप -सुनील मेंढे-१,९७,३९४-१,४९,२५४

  • गडचिरोली-चिमूर-भाजप-अशोक नेते-७७,५२६-२,३६,८७०

  • अकोला-भाजप-संजय धोत्रे -२,७५,५९६-२,०३,१०७

  • बुलडाणा-शिवसेना-प्रतापराव जाधव-१,३३,२८७-१,५९,५७९

  • वाशिम-यवतमाळ-शिवसेना-भावना गवळी-१,१७,९३९-९३,८१६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT