lok sabha election arvind kejriwal allegation bjp govt over aap leaders finance Sakal
लोकसभा २०२४

Arvind Kejriwal : ‘आप’ची बँक खाती गोठविली जाणार; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आरोप

‘आप’ नेत्यांना भाजपच्या मुख्यालयापर्यंत जाण्यापासून रोखले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘आम आदमी पक्षाच्या (आप) वाढत्या लोकप्रियतेला घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले असून, ‘आप’च्या सर्व नेत्यांना तुरुंगात डांबण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपची सर्व बँकांची खाती गोठविली जाणार आहेत,’’ असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला.

‘जेल का जवाब व्होट से’ अशा घोषणा देत भाजपच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना रविवारी निम्म्या रस्त्यात पोलिसांनी अडविले. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आज आपचे सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयासमोर धरणे देण्याचा इशारा दिला होता.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचे स्वीय साहाय्यक विभवकुमार यांना अटक करण्यात आली आहे. आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी विभवकुमार यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपच्या मुख्यालयावर धडक देण्याचा इरादा बोलून दाखविला होता.

‘‘आपच्या सर्व नेत्यांना भाजपने अटक करावी,’’ असे आव्हान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी १२ वाजता याच मार्गावर असलेल्या ‘आप’च्या कार्यालयात सर्व नेते एकत्रित जमले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या मुख्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले.

तसेच यावेळी दिल्ली पोलिसांनी कलम १४४ लावले असल्याने पाच पेक्षा अधिक जणांना एकत्र जमता येणार नव्हते. ‘आप’च्या कार्यालयासमोरली मार्गावर मुख्यमंत्री केजरीवाल आणि अन्य सर्व नेत्यांना अडविल्यानंतर या नेत्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन केले.

‘‘पंतप्रधान मोदींना आम्ही अर्धा तास वेळ देतो, या काळात भाजपने ‘आप’च्या सर्व नेत्यांना अटक करून दाखवावी,’’ असे आव्हानही त्यांनी दिले. परंतु अर्धा तासात कुणालाही अटक करण्यात आली नाही.

यावेळी मंत्री आतिशी, मार्लेना, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांच्यासह खासदार संजय सिंग, खासदार संदीप पाठक सर्व खासदार आणि आमदारही उपस्थित होते. ‘‘जब जब मोदी डरता है, पोलिस को आगे करता है,’’ ‘‘लोकतंत्र मे हिटलरशाही नहीं चलेगी,’’ ‘‘जेल का जवाब, व्होट से,’’ अशा घोषणा देण्यात आल्या.

धरणे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलता मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांनी ‘आप’ची मुस्कटदाबी करण्याचा चंग बांधला आहे. देशात ‘आप’ची वाढती लोकप्रियता त्यांच्यासाठी चिंतेचा विषय झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन झाडू सुरू केले आहे. स्वतः मोदी यांनी ही बाब त्यांना भेटायला गेलेल्या लोकांना सांगितली आहे. आपची लोकप्रियता वेगाने वाढत असल्याने ते घाबरले आहेत. भविष्यात भाजपला आव्हान निर्माण होऊ नये यासाठी ‘आप’ला संपविण्याचा डाव पंतप्रधान मोदी यांनी आखला आहे.’’

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयात दिलेल्या जवाबामध्ये निवडणुकीनंतर ‘आप’चे खाते गोठविले जाणार असल्याचे म्हटले असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. एवढेच नव्हे तर आपचे कार्यालयसुद्धा काढून आपला रस्त्यावर आणण्याचा इरादा पंतप्रधान मोदींचा आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी कोणतेही कार्य करू शकले नाही. याउलट आप सरकारच्या मोफत वीज, पाणी, महिलांना मोफत बस प्रवास यांसह अनेक योजना लोकांना आवडल्या.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली

‘आप’मधील माझ्या सहकाऱ्यांनी ‘निर्भया’ला न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले होते, आता तेच माझ्यावर हल्ला करणाऱ्याचे समर्थन करत आहेत.

- स्वाती मालिवाल, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT