Lok Sabha Election Result BJP  sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result BJP : पराभव अपेक्षेपेक्षा मोठा

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात गेली दहा वर्षे सातत्याने क्रमांक एकवर असलेला भारतीय जनता पक्ष यंदा अव्वल स्थान राखू शकला नाही. पक्षाच्या १२ जागा कमी झाल्या. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या बालेकिल्ल्यांसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागात भाजपला पराभव पत्करावा लागला. अखंड शिवसेना समवेत नसताना भाजप पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरा गेला. नरेंद्र मोदी यांना २०१४ मध्ये पंतप्रधान करण्यासाठी भाजपने जी बांधणी केली त्यात महाराष्ट्राने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती.

२०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील युती ४० जागांच्या पार गेली होती. कमळ फुलले होते. या वेळी मात्र रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील अशा तीन केंद्रीय मंत्र्यांचा तर सुधीर मुनगंटीवार या राज्यातल्या बड्या मंत्र्याचा पराभव झाला. संपूर्ण भारतात रस्त्याचे जाळे उभारणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून तर दुसरे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणातून निवडून आले.

तोडफोडीचे राजकारण नाकारले

शेतमालाच्या किंमतींबद्दलचा असंतोष, तेच ते चेहरे पुन्हा खासदारकीसाठी मैदानात उतरवणे, बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात असलेली खदखद अशा कारणांमुळे पक्षाला महाराष्ट्रात फटका बसला आहे.

राज्यात २०१९ मध्ये सत्तास्थापनेसाठी जनतेने कौल दिला तरी भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन पाळले नाही, असा ठपका ठेवत शिवसेना बाहेर पडली. बाहेर पडलेल्या या पक्षाने वैचारिक भूमिकेचा बडेजाव न करता पर्यायी सरकार स्थापन केले. नंतर भाजपने घडवलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून खाली खेचले. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलेही झाली.

हा घटनाक्रम पसंत न पडल्याने जनता नाराज झाली अन भाजपपासून दूर गेली असावी, असे दिसते. दोन निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू कमी झाली किंवा या निवडणुकीत चालली नाही, असे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा, बैठकांचा धडाका लावला तरी त्याचा लाभ झाला नाही. या स्थितीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना या दोघांच्या नेतृत्वाबाबत काही फेरविचार करावा लागेल का, याचेही उत्तर लवकर मिळेल. मराठा समाजाच्या रोषाला तोंड देताना ओबीसींची मतपेढी नव्याने सक्रिय करावी लागेल, अशी चिन्हे आहेत.

सत्तेवर मळभ

आमदारांनी केलेल्या पक्षांतराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात येत्या काही दिवसांत देईल.त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर होईल काय याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे.दिल्लीत असलेले विनोद तावडे पुन्हा महाराष्ट्रात परतणार का, हाही प्रश्‍न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT