Loksabha Election Result sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Result : मतदारराजाचा संमिश्र कौल

निखिल पंडितराव : सकाळ वृत्तसेवा

दक्षिण महाराष्ट्र

कोल्हापुरात काँग्रेस, हातकणंगलेत

शिवसेना आणि सांगलीत अपक्ष असा संमिश्र कौल दक्षिण महाराष्ट्रातील मतदारांनी दिला. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली येथे विद्यमान खासदारांविषयी नाराजीचा फटका थेट बसला असून, हातकणंगलेत महायुतीच्या नेत्यांना नाराजी दूर करत एकत्र मोट बांधण्यात यश आल्याने एक जागा राखण्यात महायुतीला यश आले.

कोल्हापुरात दलित, मुस्लिम आणि

ओबीसींची मते ही काँग्रेस सोबत राहिल्याचे दिसून आले. यामुळेच काँग्रेसने आघाडी घेतली. पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मिळाली नाहीत. नेते एकीकडे आणि कार्यकर्ते दुसरीकडे, असे चित्र स्पष्ट दिसत आहे.

राधानगरी, चंदगड आणि कागल या तीन मतदारसंघांत महायुतीचे आमदार असतानाही कागल वगळता सगळीकडे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मतांची आघाडी मिळाली. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या संपर्काचा अभाव हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला. काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघात २५ वर्षांनंतर विजयी झाला. यापूर्वी कोणतीही निवडणूक न लढविलेले शाहू महाराज पहिल्यांदाच रिंगणात उतरले आणि विजयी झाले. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि छत्रपती घराण्याविषयी असलेला आदर यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

हातकणंगलेमध्ये २०१९ च्‍या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे दलित, मुस्लिम मते शिवसेनेकडे वळली होती;

पण यावेळी मतदारांनी ही विभागणी स्वतःच टाळली. मराठा समाज ताकदीने धैर्यशील माने यांच्या मागे उभा राहिला. धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका त्यांना बसला नाही. उलट महायुती म्हणून आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांच्यासह सगळ्यांची मोट बांधण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आले. महाविकास आघाडीचा उमेदवार उशिरा ठरल्याने त्याचा फायदाही माने यांना झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे दोन वेळा या मतदारसंघाचे खासदार असूनही त्यांची यावेळी घटलेली मते चिंतन करायला लावणारी आहेत.

विशाल पाटील यांना सहानुभूती

काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी केल्‍यामुळे हा मतदारसंघ चर्चेत होता. मुस्लिम, दलित तसेच काही प्रमाणात मराठा समाज विशाल यांच्याबरोबर राहिला. गेल्यावेळी ही मते वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपल्याकडे खेचली होती. भाजपचा अंतर्गत कलह संजय पाटील यांना पराभवाकडे घेऊन गेला. वसंतदादा घराण्याला डावलले जाते, हा संदेश लोकांमध्ये गेल्याने विशाल यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. भाजपमधील विलासराव जगताप आणि अजित घोरपडे यांची थेट नाराजी संजयकाका पाटील यांना भोवली. जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप होता. वसंतदादा विरुद्ध राजारामबापू असा सांगली जिल्ह्याचा पूर्वांपर संघर्ष आहे, तो येथे दिसून आला. या निवडणुकीने सांगली जिल्ह्याचा नेता म्हणून विश्वजित कदम यांचे नाव पुढे आले, त्याचा जयंत पाटील आणि भाजप नेत्यांना हा मोठा धक्का आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT