Loksabha Election Result Konkan sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Result Konkan : महायुतीचा विजयाचा डंका

सकाळ वृत्तसेवा

रायगडमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा पराभव झाला. एकेकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी रायगड लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजवले होते. मागील निवडणुकीपर्यंत धार्मिक राजकारणाचा लवलेशही या मतदारसंघात दिसत नव्हता; मात्र २०२४ च्या निवडणुकीत धार्मिक राजकारण भडकावण्याचा प्रयत्न झाला. यातून एका विशिष्ट धर्मातील लोकांना सध्याच्या सरकारविरोधात मतदान करण्याचे आवाहनही झाले; मात्र प्रत्यक्ष मतदानात येथील मतदारांनी धर्म, जातीच्या राजकारणाला जवळ न करता संकटात धावून आलेल्या लोकप्रतिनिधीला जवळ केल्याचे प्रत्यक्ष निकालाच्या आकडेवारीवरून दिसून आले.

कोरोना, निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात मतदारसंघात दररोज सक्रिय असणाऱ्या सुनील तटकरे यांच्या बाजूने पाच लाख आठ हजार ३५२ इतके मतदान करत मतदारांनी त्यांना विजयी केले. मुस्लिम मतदार असलेल्या श्रीवर्धनमध्ये मतदारसंघात भाजपची साथ असलेल्या सुनील तटकरेंना मतदान केल्याचे दिसून आले, तर कुणबी व्होट बॅंकेचेही अनंत गीतेंना फारसे मताधिक्य मिळवता आले नाही.

पालघर लोकसभेत भाजपच्या डॉ. हेमंत सावरा यांनी विजयश्री खेचून आणली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रचार दौरा कामी आला. राममंदिरापासून विकासापर्यंतचे मुद्दे कामी आले. महाविकास आघाडीने सर्वांत प्रथम महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी वाढवण बंदरविरोधासह विकासावर भर दिला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अन्य नेतेमंडळींनी प्रचारात उडी घेतली; परंतु त्यांना दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. स्वबळावर निवडून येणार असा एल्गार बहुजन विकास आघाडीने केला होता; मात्र त्यांचे उमेदवार राजेश पाटील मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये, अचूक रणनीतीचा विजय

भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या आधी दोनदा खासदार झालेल्या विनायक राऊत यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिवसेनेला असलेली सहानुभूती, जातीय ध्रुवीकरणाची शक्यता, रत्नागिरीत असलेले संघटनात्मक बळ याच्या जोरावर लढणाऱ्या राऊत यांचे बळ भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीसमोर कमजोर पडले. शिवसेनेतील फुटीनंतर मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे शिवसेनेत आले. साहजिकच त्यांच्या अनुक्रमे सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे बळ कमी झाले. त्या दोघांनी राणेंसाठी ताकद लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT