Youngest MP 18th Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Result: वय-25 वर्षे, पद-खासदार... हे आहेत सर्वात तरुण MP, राजकीय धुरंधरांचा केला पराभव

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक घटना घडल्या आहेत. 4  जूनला जाहीर झालेल्या निकालात अनेक नवीन चेहरे समोर आले. यामध्ये सात युवा खासदारांचा देखील समावेश आहे. यामधील जास्त इंडिया आघाडीतील असून 1 एनडीएमधील आहे. यामधील अनेक युवा खासदारांची राजकीय पार्श्वभूमी आहे. यातील 4 खासदार तर फक्त 25 वर्षाचे आहेत. ते कोण आहेत, जाणून घ्या...

यामध्ये पुष्पेंद्र सरोज, प्रिया सरोज, शांभवी चौधरी आणि संजना जाटव यांचा समावेश आहे. पुष्पेंद्र सरोज आणि प्रिया सरोज यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. तर शांभवी चौधरी, संजना जाटव यांनी लोक जनशक्ती पक्ष (लोजप) आणि काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला.

1. पुष्पेंद्र सरोज - पुष्पेंद्र सरोज यांनी उत्तर प्रदेशची कौशांबी लोकसभा जागा जिंकली, त्यांनी विद्यमान भाजप खासदार विनोद कुमार सोनकर यांचा 1,03,944 मतांनी पराभव केला.

ते इंद्रजित सरोज यांचे पुत्र आहेत. जे सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, पाच वेळा आमदार राहिलेले आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इंद्रजित सरोज यांना सोनकर यांच्याकडून ही जागा गमवावी लागली होती. लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पुष्पेंद्र सरोज यांचे वय 25 वर्षे 3 महिने आहे.

2. प्रिया सरोज- 25 वर्षीय तरुणीने 2024 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील मच्छलीशहर मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर लढवली होती. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार भोलानाथ यांचा 35,850 मतांनी पराभव केला. प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज हे तीन वेळा खासदार राहिले आहेत.  

3. शांभवी चौधरी - एलजेपीच्या तिकिटावर निवडणूक लढवून, शांभवी चौधरीने बिहारच्या समस्तीपूर मतदारसंघात विजय मिळवला. जनता दल (युनायटेड) मंत्री महेश्वर हजारी यांचा मुलगा काँग्रेसच्या सनी हजारी यांचा शांभवीने एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.

शांभवी चौधरी अशोक चौधरी यांची मुलगी आहे. ती बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा भाग आहे. अशोक चौधरी यांनी अलीकडेच काँग्रेसमधून जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. शांभवी चौधरी यांचे आजोबा, दिवंगत महावीर चौधरी, हे देखील काँग्रेसचा एक भाग होते आणि बिहारमध्ये जुन्या पक्षाची सत्ता असताना त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

4. संजना जाटव - संजना जाटव यांनी राजस्थानमधील भरतपूर जागा जिंकून भाजपच्या रामस्वरूप कोळी यांचा 51,983 मतांनी पराभव केला. गेल्या वर्षी राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत तिने नशीब आजमावले होते पण भाजपच्या रमेश खेडी यांच्याकडून फक्त ४०९ मतांनी पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण

Raj Thackeray: "राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"; राज ठाकरेंचा घणाघात

Stock Market Crash: चार राज्यातील विधानसभेत भाजपचा पराभव झाला तर शेअर बाजाराचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

भारताला जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या Dipa Karmakar ची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

SCROLL FOR NEXT