Kolhapur Constituency Shiv Sena esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Shiv Sena : पक्ष दुभंगला, बुरूज ढासळले.. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाणाचं वर्चस्व दाखवून दिलं, पण..

मुंबईत शिवसेना दुभंगली. एकनाथ शिंदे यांनी सवतासुभा मांडत थेट भाजपशी नाळ जुळवली आणि ते मुख्यमंत्री झाले.

लुमाकांत नलवडे

सध्या विद्यमान खासदारांना लोकसभेची उमेदवारी मिळविताना दमछाक करावी लागत आहे. कार्यकर्ते दुभंगले आहेत. शिवसेना एक राहिलेली नाही.

Kolhapur Constituency Shiv Sena : गल्लोगल्ली कार्यकर्ते आणि वाघाचे चिन्ह असलेल्या शिवसेनेच्या शाखा ही शिवसेनेची ताकद. आंदोलनाची धार काय असते याचे जिवंत उदाहरण दाखविणारा शिवसेनेचा (Shiv Sena) कार्यकर्ता, नेते आणि आमदार-खासदार आता दुभंगले आहेत. सर्वांनीच जनतेसाठी म्हणून आपला सवता सुभा मांडला. त्याला कोणी ‘गद्दार’ म्हणाले, तर कोणी ‘बंड’ म्हणाले.

या सर्वांमुळे मात्र दुभंगलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद तुलनेने कमी झाली. एकंदरीतच शिवसेनेचा बुरूज ढासळला. ऐतिहासिक बिंदू चौकात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे भाषण असले की दुकानाला कुलूप लावून, प्रसंगी परगावी नोकरीवर असले, तर दांडी मारून हजेरी लावणाऱ्यांनी शिवसेनेवर जीवापाड प्रेम केले. याच शिवसेनेने शहरात आमदार दिले. कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाणाचे वर्चस्व दाखवून दिले.

त्याच बाळासाहेबांनी जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार पाहिजे हे स्‍वप्न पाहिले. उशीर झाला; पण बाळासाहेबांच्या निधनानंतर का होईना, जिल्ह्याला शिवसेनेचे धनुष्यबाणावर विजयी झालेले दोन खासदार मिळाले. जिल्ह्यात दहा पैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. ही शिवसेनेची वाढलेली ताकद. मात्र, मुंबईत शिवसेना दुभंगली. एकनाथ शिंदे यांनी सवतासुभा मांडत थेट भाजपशी नाळ जुळवली आणि ते मुख्यमंत्री झाले. मुंबई-ठाण्यातील या भूकंपाचे धक्के थेट राधानगरीच्या तटापर्यंत पोहोचले. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटाशी जुळवून घेतले.

याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ‘गद्दारा’ची उपमा देत ‘गेले तर कावळे राहिले ते मावळे’ म्हणून शड्डू ठोकला. ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव, ‘धनुष्यबाण’ चिन्ह गमावले. तरीही आता हातात ‘मशाल’ घेऊन ती पेटविण्याचा, त्याची धग जिल्ह्यातील वाड्यावस्तीपर्यंत पुन्हा पोचविण्याचा प्रयत्न ठाकरे बाप-लेक करीत आहेत. स्थानिक उपनेते स्थानिक जिल्हाप्रमुख संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणेंची त्यांना साथ आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी खुद्द कोल्हापुरातील शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊन येथील नेत्यांना, कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यात महिन्यातून दोन दौरे झाले. सहा आमदारांची आणि दोन खासदारांची ताकद त्यांना पुन्हा उभा करायची आहे. सध्या विद्यमान खासदारांना लोकसभेची उमेदवारी मिळविताना दमछाक करावी लागत आहे. कार्यकर्ते दुभंगले आहेत. शिवसेना एक राहिलेली नाही. त्यामुळे उमेदवाराच्या विजयाबाबत ठोस संभ्रमावस्था असल्याची चर्चा वाढली. उमेदवारी घोषित करण्यासाठी होणारा वेळ हे त्याला खतपाणी घालत आहे.

विविध गटांत विभागलेली ताकद

शिवसेनेकडील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे कुटुंबीय गेली चाळीस वर्षे राजकारणात आहेत. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी याच मतदारसंघात अपक्ष रिंगणात उतरून एकेकाळी इतिहास घडविला. आजही शहरात काही प्रमाणात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे. कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये मंडलिकांचा दबदबा आहे. या व्यतिरिक्त भाजपचे नेते-कार्यकर्ते, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंडलिकांचे मेहुणे असलेले आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते याच बरोबर खुद्द मंडलिक गट म्हणून त्यांची ताकद आहे. त्याचाही उपयोग या लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो.

असे आहे हातकणंगलेतील चित्र...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत. त्यांनी शिंदे गटासोबत जाणे पसंत केले असले तरीही त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे तीन माजी आमदार आहेत. डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरूडकर यांची ताकद वेगळी आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर शिंदे गटातील माने यांच्याकडे माने गट म्हणून स्वतंत्र आहे. पिढ्यान्‌पिढ्या ते राजकारणात आहेत. आजपर्यंत पक्ष बदलले असले, तरीही त्यांना मानणारा एक वर्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT