Amravati Youth Issues 
लोकसभा २०२४

Amravati Employment Issue: फक्त सरकारी नोकरी हाच तरुणांपुढे पर्याय का? अमरावतीतील तरुण अडकलाय चक्रव्युहात

विदर्भातील स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न काय सांगतो?

Amit Ujagare (अमित उजागरे)

अमरावती : आता फक्त सरकारी नोकरीच बाकी काही नाही, अशी परिस्थिती सध्या आपल्याला विदर्भात पहायाला मिळते आहे. रोजगार हा इथल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न अजूनही तसाच आहे. दर पाच वर्षांनी इथं निवडणुका होतात अनेक खासदार येतात-जातात.

पण इथल्या तरुणांचा पोटापाण्याचा गंभीर प्रश्न अजूनही कोणी सोडवू शकलेलं नाही. त्यामुळं एकीकडं सरकारी नोकऱ्या कमी होत असताना, त्यांचं खासगीकरण होत असताना इथला तरुण याच सरकारी नोकरीसाठी आग्रही आहे. यामुळं तो मोठ्या चक्रव्युहात अडकलाय की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Loksabha Election 2024 Vidarbh Employment Issue why is government job only option for youth)

अमरावतीचा गाडगे नगर भाग हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाग आहे. या भागात अनेक कोचिंग क्लासेस आहेत, इथं विद्यार्थी स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना केवळ सरकारी नोकरीचीच त्यांना आस असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. खरंतर तर एकीकडं सरकारी नोकऱ्यांचं खासगीकरण होत असताना, त्यांचं प्रमाण कमी होत असताना इथले विद्यार्थी मात्र सरकारी नोकरीसाठी धडपड करताना दिसतात, तेव्हा ते एका चक्रव्युहात अडकल्याची जाणीव होते.

या समस्येवर भाष्य करताना किरण पाटील या विद्यार्थ्यानं सांगितलं की, "खासगी कंपन्या आमच्याकडं नाहीत, आहेत त्या खूपच कमी आहेत. तिथं पुरेसा पगारही मिळत नाही, त्यामुळं या ठिकाणी ग्रामीण भागातील थोडी कमी शिक्षित मुलं कामासाठी येतात. पण इथं शहरी भागातील मुलांना वाव नाही. उलट सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थिरता आहे, पगार चांगले आहेत. त्यामुळं जर स्पर्धा परीक्षांसाठी एक-दोन वर्षे मेहनत घेतली तर सरकारी नोकरीची व्यवस्था कुठेतरी होऊ शकते, असं आता शहरी उच्चशिक्षित मुलांना वाटतं आहे" (Latest Maharashtra News)

"दहा ते बारा वर्षापासून अमरावतीत एकही उद्योग तयार झालेला नाही, जे काही आहेत ते अवजड उद्योग आहेत. जर इथल्या एखाद्या मुलानं म्हटलं की आम्ही पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन काम करतो. तर तिथं आम्हाला पगार दहा ते पंधरा हजार रुपये मिळतो, या पगारात आमचं भागत नाही. जर इतकं परत आलो तर आमचा अनुभव मागतात. (Marathi Tajya Batmya)

मग शेवटी हा विद्यार्थी निराश होऊन कुठे जातो तर तो सरकारी नोकरीकडं जातो त्याला या नोकऱ्या सेफ वाटतात. अवजड उद्योगात आम्ही कामंही करु पण इथं आठ तासांचे सहा हजार रुपये सांगतात. या पैशात शिक्षण आणि राहणं कसं भागवणार?" असं रोहित यानं सांगितलं.

"आम्हाला जर इथून पुण्यात स्थलांतर करायचं असेल तर तिथं आम्हाला रहायची खायची सोय करावी लागते. त्याठिकाणी १५-२० हजार रुपये पगार दिला जातो. पुण्यात प्रत्येक उमेदवाराला राहायचा आणि खायचा खर्च हा ४ ते ५ हजार रुपये असतो. म्हणजेच एकावेळेला ७० रुपये खर्च येतो, हे आम्हाला कसं परवडतं? अमरावतीतील आत्तापर्यंतचे खासदार हे हिंदू-मुस्लिम यावरच बोलतात. पण त्यांनी रोजगारावर लक्ष द्यावं," अशी अपेक्षा अमोल या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानं व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

"आम्हाला जर इथून पुण्यात स्थलांतर करायचं असेल तर तिथं आम्हाला रहायची खायची सोय करावी लागते. त्याठिकाणी १५-२० हजार रुपये पगार दिला जातो. पुण्यात प्रत्येक उमेदवाराला राहायचा आणि खायचा खर्च हा ४ ते ५ हजार रुपये असतो. म्हणजेच एकावेळेला ७० रुपये खर्च येतो, हे आम्हाला कसं परवडतं? अमरावतीतील आत्तापर्यंतचे खासदार हे हिंदू-मुस्लिम यावरच बोलतात. पण त्यांनी रोजगारावर लक्ष द्यावं," अशी अपेक्षा अमोल या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानं व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT