loksabha election 2024 
लोकसभा २०२४

Loksabha Diary : नक्षली कुरापती थांबल्या तरी मोहाशिवाय पर्याय नाही... छत्तीसगडच्या सीमेवरील गाव कोणत्या मुद्द्यावर करणार मतदान?

कार्तिक पुजारी

Loksabha election 2024

लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. या काळात राजकीय नेत्यांना जाग आलेली असते अन् ते गावोगावी भेटी देत असतात. अनेक नेते तर फक्त निवडणुका आल्या की गावात तोंड दाखवत असतात. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील जमाकुंडो हे छोटं गाव. गावापासून 7 किलोमीटर अंतरावर छत्तीसगडची सीमा. नक्षलवाद्यांचा या भागात प्रभाव असल्याने नक्षलविरोधी दल गावात तैनात आहेत. संपूर्ण गावात आदिवासी गोंड समाजाचे लोक राहतात.

जमाकुडो हे गाव गडचिरोली चिमुर या मतदारसंघात येतं. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर असल्या तरी गावात प्रचाराचं वातावरण नाही. गावातील लोकांचे काम आपापल्या गतीने सुरु आहे. गावकऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत कोणता नेता किंवा पक्ष प्रचाराला आला नाही. विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते आहेत. त्यांचं तोंडदेखील अनेक गावकऱ्यांनी पाहिलेलं नाही. कोणत्या आमदाराने देखील गावातील प्रश्न जाणून घेतले नाहीत.

गाव दोन गोष्टींसाठी महत्वाचं ठरतं. गावापासून जवळच कचारगड या नैसर्गिक गुहा आहेत. आयर्न ओरच्या त्या आशियातील सर्वात मोठ्या गुहा असल्याचं सांगितलं जातं. याच ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात मोठी यात्रा भरत असते. शिवाय गावापासून जवळच हाजरा धबधबा आहे. बेवारटोला धरणामुळे गावकऱ्यांचं ९० च्या दशकात विस्थापन झालं. धरण हाकेच्या अंतरावर असून देखील गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही. गावात नळ आला नाही. गावकऱ्यांना हँडपम्पवर अवलंबून राहावं लागतं. या सर्व भागातील जमिनीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने पम्पमधून पाणी अनेकदा गढूळच येते.

गावात बारावीपर्यंतची शाळा आहे. पण गावातील शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. शिवाय गावकरी गोंडी भाषा बोलतात. मराठी भाषा बंधनकारक असल्याने अनेक मुलं भाषेच्या भीतीपोटी शाळेतच येत नाहीत. बारावीनंतर क्वचित मुलं आयटीआयला प्रवेश घेतात. पण त्या पलीकडे मुलं शिक्षण घेताना दिसत नाहीत.

गावातील रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. गावातील लोक सहसा उदरनिर्वाहाच्या पारंपरिक पद्धतीवरच अवलंबून आहेत. अनेक गावकरी दिवसभर मोहाचे फुलं गोळा करतात. ४० ते ५० रुपये किलो दराने हे फळं विकले जातात. काही गावकरी बांबूचे टोपले विनतात. १००-१५० रुपयांना जोडी अशा दाराने बाजारामध्ये याची विक्री होते. गोंदिया जिल्हा हा भात शेतीसाठी ओळखला जातो. गावातील अनेक पुरुष पूर्णवेळ शेती करत नाहीत. ३-४ महिने शेतात राबतात त्यानंतर रोजगाराच्या शोधात हैदराबाद, बेंगळुरू, मुंबई सारख्या शहरात जातात. गावात काही प्रमाणात मनरेगाची कामे मिळतात, पण त्यातून १५० ते २०० रुपयेच मिळतात. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती रोजगारासाठी बाहेर जाते.

गावातील वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. गावाजवळून हावडा- मुंबई रेल्वे लाईन जाते. येथेच दरेकसा रेल्वे स्टेशन आहे. पण प्रत्येक रेल्वे स्टेशन वर थांबत नाही. इटवारी- रायपूर लोकल ट्रेनच्या वेळेचा काही नियम नसतो. गावात दोन एसटी बस येतात. पण चारनंतर गावात येण्या-जाण्यास कोणताही पर्याय राहत नाही. छत्तीसगडची बसदेखील गावात येत असते.

गावात आरोग्य केंद्र आहे पण येथे प्राथमिक उपचार केले जातात. मोठी आरोग्य समस्या निर्माण झाल्यास किंवा गरोदर महिलांबाबत जटील समस्या निर्माण झाल्यास गावापासून ६० किलोमीटर अंतरावरील गोंदिया जिल्हा गाठावा लागतो. मलेरिया ही गावातील प्रमुख आरोग्य समस्या आहे.

गावातील जवळपास सर्वच लोक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. गावातील मुलं १४-१५ व्या वर्षापासूनच दारू प्यायला शिकतात. अनेक महिला देखील दारूच्या आहारी गेलेल्या आहेत. गावात मोहाची दारू सहज मिळते. शिवाय ती स्वस्त देखील असते. त्यामुळे व्यसनाचे प्रमाण जास्त आहे.

नक्षलवाद्यांचा प्रभाव गावात आता कमी झाला आहे. गेल्या जवळपास २० वर्षांपासून गावात कोणती मोठी नक्षल कारवाई झालेली नाही. एकंदरीत गावातील लोक जैसे-थे जीवन जगत आहेत आणि राजकीय नेत्यांचे सर्वच प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT