Loksabha Election 2024- देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशात १९५२ पासून आतापर्यंत १७ लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. १८ व्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग वाजणार आहे. या पाश्वभूमीवर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय झाला? कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात? हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.
१९५२
१९५१-५२ च्या लोकसभा निवडणुकीत ४८९ जागांसाठी मतदान झाले होते. यातील ३६४ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर ३ जागा जनसंघला मिळाल्या होत्या. डाव्या पक्षांना २७, समाजवाद्यांना १२ जागांवर समाधान मानावे लागले होते.
१९५७
१९५७ मध्ये ४९४ जागांवर निवडणुका झाल्या, यात काँग्रेसला ३७१ जागा मिळाल्या. डाव्या पक्षांना २७, तर समाजवादी पक्षांना १९ जागा मिळाल्या.
१९६२
१९६२ मध्ये ४९४ जागांसाठीच्या मतदानात काँग्रेसला ३६१, डाव्या पक्षांना २९ आणि प्रजा समाजवादी पक्षाला १२ जागा आणि जनसंघाला १४ जागा मिळाल्या होत्या
१९६७
१९६७ मध्ये ५२० जागांसाठी मतदान झाले. काँग्रेसच्या जागा पहिल्यांदाचा ३०० पेक्षा कमी झाल्या. काँग्रेसचा २८३ जागा मिळाल्या. जनसंघाच्या जागा वाढल्या होत्या. पक्षाला ३५ जागांवर विजय मिळाला होता. डाव्या पक्षांपैकी सीपीआयला २३ आणि सीपीएमला १९ जागा मिळाल्या. प्रजा समाजवादी पक्षाला १३ जागा मिळाल्या होत्या.
१९७१
५१८ जागांसाठी झालेल्या १९७१ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसला ३५२, सीपीएम २५, सीपीआय २४ आणि डीएमके २३ आणि जनसंघाला २२ जागा मिळाल्या
१९७७
१९७७ मध्ये काँग्रेसला पहिला धक्का बसला. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरांच्या काँग्रेसला १५४ जागा मिळाल्या, दुसरीकडे जनता पार्टीला ५४२ पैकी २९८ जागा जिंकता आल्या
१९८०
१९८० मध्ये जनतेने पुन्हा इंदिरांच्या काँग्रेसवर विश्वास दाखवला. काँग्रेसला ३५३ जागा जिंकता आल्या. जनता सेक्युलरला ४१, सीपीएमला ३६, सीपीआयला ११ आणि डीएमकेला १६ जागा मिळाल्या
१९८४
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये काँग्रेसला प्रचंड सहानभूती मिळाली. काँग्रेसने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. काँग्रेसला तब्बल ४१५ जागा मिळाल्या. भाजपची देखील स्थापना झाली होती. भाजपला २ जागा मिळाल्या. टीडीपीला २८, सीपीएमला २२, सीपीआयला सहा जागा मिळवता आल्या.
१९८९
१९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसला १९७ जागा मिळाल्या, भाजपला ८६, जनता दलला १४१, सीपीएमला ३२ आणि सीपीआयला १२ आणि टीडीपीला २ जागा मिळाल्या.
१९९१
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसला २३२, भाजपला ११९, जनता दल ५९, सीपीएमला ३५, सीपीआयला १३ आणि टीडीपीला १३ जागा मिळाल्या.
१९९६
अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजप पहिल्यांदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजपला १६१ जागा मिळवता आल्या, काँग्रेसला १४०, जनता दलला ४६, सीपीएमला ३२, समाजवादी पार्टीला १७, टीडीपीला १६, सीपीआयला १२ आणि बसपला ११ जागा मिळाल्या.
१९९८
भाजप सरकार जास्त दिवस टिकले नाही. १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला पुन्हा संधी मिळाली. भाजपला १८२, काँग्रेसला १४१ जागा मिळाल्या. सीपीएम ३२, सपा २०, टीडीपी १२ बसपला पाच जागा मिळाल्या.
१९९९
तेराऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १८२ जागा मिळाल्या काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या. या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार सत्तेत होते.
२००४
२००४ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला संधी मिळाली. काँग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या. याकाळात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वातील यूपीएचं सरकार सत्तेत होतं.
२००९
मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधान झाले. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या, तर भाजप ११६ जिंकली.
२०१४
२०१४ मध्ये भाजपला चांगले दिवस आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपला पहिल्यांदाच ५४३ पैकी २८२ जागा जिंकता आल्या. काँग्रेसची मोठी घसरण होत ४४ जागांवर समाधान मानावे लागले. एआयडीएमकेला ३७, टीएमसीला ३४ जागा मिळाल्या.
२०१९
१७ व्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळाल्या. भापजने तिनशेचा आकडा पार करत ३०३ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला फक्त ५२ जागांवर राहावं लागलं. (Marathi Latest News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.