Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : अमेठी, रायबरेलीतून राहुल, प्रियांका निवडणूक रिंगणात? ; काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशातील यादी जाहीर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी किंवा पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा या अमेठी किंवा रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्‍वास राज्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि सदस्यांना असल्याचा विश्‍वास अजय राय यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी किंवा पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा या अमेठी किंवा रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्‍वास राज्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि सदस्यांना असल्याचा विश्‍वास अजय राय यांनी व्यक्त केला. नेहरू-गांधींची कौटुंबिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठी किंवा रायबरेली जागांसाठी उमेदवारांची नावे न घेता, काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील नऊ उमेदवारांची यादी जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर राय यांचे हे वक्तव्य आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून तिकीट देण्यात आलेल्या राय यांनी या वेळी सांगितले, की काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींना अमेठीतून आणि प्रियांका गांधी यांना रायबरेलीमधून उभे करण्यासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव आणत आहेत. एक गोष्ट निश्चित आहे, की या दोन्हींपैकी एका जागेवर दोघांपैकी एकजण निवडणूक लढवणार आहे.

श्री. राय म्हणाले, की राहुल आणि प्रियांका गांधी यांनी अनुक्रमे अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवावी, ही पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षनेतृत्वाने घ्यायचा आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अनुक्रमे अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याच्या शक्यतांबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले, की जर पक्षाने अद्याप या दोन जागांवर उमेदवार घोषित केले नाहीत, तर याचा अर्थ पक्ष कार्यकर्त्यांच्या मागणीवर विचार केला जात आहे.

होळीनंतर अमेठी आणि रायबरेलीसह उत्तर प्रदेशातील उर्वरित आठ जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित केली जातील, असेही राय म्हणाले.काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये १७ जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यांनी शनिवारी आपली पहिली यादी जाहीर केली.

ज्यात राय यांच्याव्यतिरिक्त सहारनपूरमधून इम्रान मसूद, अमरोहामधून दानिश अली, फतेहपूर सिक्रीमधून रामनाथ सिकरवार, कानपूरमधून आलोक मिश्रा, झाशीतून प्रदीप जैन आदित्य, बाराबंकीमधून तनुज पुनिया, अखिलेश यांना तिकीट दिले आहे. देवरिया येथील प्रताप सिंग आणि बनसगाव येथील सदन प्रसाद यांची उमेदवारी निश्‍चित करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT