raj thackeray esakal
लोकसभा २०२४

Raj Thackeray : महायुतीत लवकरच चौथा भिडू; राज ठाकरे दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश होण्याची चिन्हे आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल, असे सूतोवाच केले होते.

सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश पातळीवर अनेक बडे नेते राजधानीमध्ये पोचले आहेत. राज ठाकरेही आज सायंकाळी विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहेत ते आले तर स्वागतच आहे असे जाहीर विधान केले होते.

राज ठाकरे हे भाजप नेत्यांना भेटण्याची मागील चार दिवसांतील ही दुसरी वेळ आहे. ‘मनसे’ने दक्षिण मुंबई, रत्नागिरी आणि शिर्डी या तीन मतदारसंघांपैकी एक जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. मुंबईतील मराठी मतांच्या बेगमीसाठी ‘मनसे’ने दक्षिण मुंबईची जागा लढविणे महायुतीला उपयोगाचे ठरेल असे भाजपचे मत आहे. बाळा नांदगावकर येथून उभे राहिल्यास त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असे बोलले जाते.

राज यांच्या महायुतीमधील प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत. गेल्या काही निवडणुकांत राज यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती, यामुळेच त्यांच्याबाबत ठोस निर्णय घेताना भाजपला अडचणी येत होत्या. आता चारशेपारचे लक्ष्य गाठण्यासाठी उदार धोरण स्वीकारायचे अशी भूमिका भाजपने घेतल्याचे बोलले जाते.

पुढे काय होणार?

या खेपेस लोकसभा निवडणूक लढू नये,असा एक विचार ‘मनसे’च्या काही वरिष्ठ नेत्यांनी मांडला होता. यावर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यावर त्यांनी फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. या निवडणुकीत प्रत्यक्ष मैदानात उतरायचे की भाजपला पाठिंबा द्यायचा यावर दोन्ही पक्षांचे नेते विचार करीत आहेत.

फडणवीसांकडूनच प्रस्ताव

‘मनसे’ला महायुतीत सामावून घ्यावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वापुढे ठेवला आहे. नाशिक, पुणे व मुंबई या भागांमध्ये मनसेचा मोठा प्रभाव आहे. राज ठाकरे यांच्या वाट्याला लोकसभा निवडणुकीत फारशा जागा येणार नसल्यातरीसुद्धा विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना चांगल्या जागा मिळू शकतात असे बोलले जाते. याबाबत राज हे स्वतःच अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon Shirur Assembly election : दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूरला परतीच्या पावसाने झोडपले

IND vs NZ 1st Test : नशीबानं थट्टा अशी मांडली...! Rohit Sharma ची विचित्र विकेट पडली, कॅप्टनलाही विश्वास बसेना

Diwali Dos and Don'ts: दिवाळीला कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या नाही, वाचा एका क्लिकवर

Manini De : छोट्या पडद्यावर परतणार मानिनी डे; झी टीव्हीवरील मालिकेत साकारणार 'ही' महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT