Loksabha Election Result sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Result : मुंबईत वरचष्मा,कोकणातून हद्दपार;शिवसेना (उद्धव ठाकरे)

शिवसेनेमध्ये दोन वर्षांपूर्वी अभूतपूर्व फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विभागली गेली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नवीन नाव आणि मशाल चिन्हासह ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राखेतून भरारी घेत यशाला गवसणी घातली आहे.

दीपा कदम deepakadam3@gmail.com

शिवसेनेमध्ये दोन वर्षांपूर्वी अभूतपूर्व फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विभागली गेली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नवीन नाव आणि मशाल चिन्हासह ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राखेतून भरारी घेत यशाला गवसणी घातली आहे. विशेषत: मुंबईत चारपैकी तीन जागा राखत मुंबई ठाकरेंचीच यावर शिक्कामोर्तब केले असले तरी कोकणातून पक्ष पहिल्यांदाच हद्दपार झाला.

ठाकरेंना हा मोठा धक्का आहे. शिवसेनेची संपूर्ण वाताहत आणि पक्षाची संपुर्ण व्यवस्था विस्कळीत झाल्याने शिवसेना ठाकरे गट पुन्हा उभा राहणार की नाही?, पक्षफुटीनंतर ठाकरे गटाला खरोखरच सहानुभूती आहे का?, यावर शंका उपस्थित केल्या जात होत्या. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने या सर्व प्रश्नांची उत्तरे ठाकरे यांच्या बाजूने दिली असून ठाकरेंच्या शिवसेनेला जीवदान दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढच्या काळातही ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार असून राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मानाचे स्थान असणार आहे.

शिंदेंपेक्षा जास्त जागा

मशाल चिन्हासह प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या ठाकरे गटाने २१ जागांपैकी नऊ जागा जिंकत विजयाचे प्रमाण उत्तम ठेवलेच शिवाय दोन्ही शिवसेनेत झालेल्या लढतीत समान जागा ठाकरेंनी जिंकल्या. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली, नाशिक, यवतमाळ-वाशिम आणि शिर्डी या सात जागांवर शिवसेनेशी थेट लढून ठाकरे यांच्या पक्षाने वरचष्मा राखला. मुंबईवर ठाकरेंनी पकड ठेवली. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई व प्रथमच ईशान्य मुंबईची जागाही अपेक्षेप्रमाणे राखली.

कोकण, प.महाराष्ट्रात धक्का

मागील चार लोकसभा निवडणुकांप्रमाणे कोकणात विजय मिळविण्यात शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यश आले नाही. या वेळी कोकणात पक्षाला एकही जागा मिळाली नाही, हा मोठा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील या पक्षाला एकही जागा मिळू शकलेली नाही. हातकणंगलेमधून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सत्यजित पाटील आणि सांगलीमधून चंद्रहार पाटील यांचा पराभव झाल्याने कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही ठाकरेंच्या शिवसेनेला खाते उघडता आलेले नाही.

प्रचारात रंगत

महाविकास आघाडीसह २०१९ पासून घरोबा केलेल्या शिवसेनेला मागच्या दोन वर्षात केवळ ठाकरेंची शिवसेना इथपर्यंत आणून सिमित केले. त्यानंतर न्यायालयीन लढाई आणि निवडणूक आयोगाचा नाव, चिन्हासाठीचा लढा, त्याचबरोबर पक्षाची नव्याने बांधणी, नेत्यांमागील ‘ईडी’, ‘सीबीआय’चा ससेमिरा यातून मार्ग काढत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज्य पिंजून काढले. भाजपसमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. महाविकास आघाडीला ३० पर्यंत मिळालेल्या जागांमागे ठाकरे यांचे श्रेय फार मोठे आहे. राज्यात काँग्रेसचे प्रभावी नेतृत्व नसतानाही ठाकरे यांनी ‘मविआ’च्या प्रचारात रंगत आणली.

खरा कस विधानसभेत

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा यापुढचा कस मुंबई महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत लागणार आहे. या निवडणुका किती चुरशीच्या होतील,याचे बीज लोकसभा निवडणुकीच्या निकालात आहे. शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडलेल्या खासदारांना मतदार धडा शिकवतील, असा एक अंदाज व्यक्त केला जात होता. सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दिलेल्या प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांना खासदारकी वाचवण्यात यश मिळाले आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT