Girish Mahajan met MP Udayanraje Bhosale Jalmandir Palace Satara esakal
लोकसभा २०२४

Satara Loksabha : भाजपनं उदयनराजेंचं तिकीट कापलं? महाजन म्हणाले, 'राजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही..'

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी तिकीट मागण्याची गरज नाही.

सकाळ डिजिटल टीम

'आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. उदयनराजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही किंवा त्यांचे तिकीट नाकारण्याचा विषय नाही.'

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी तिकीट मागण्याची गरज नाही, तसेच त्यांचे तिकीट नाकारण्याचाही विषय नाही. सध्या महायुतीतील तीन पक्षांत जागा वाटपावरून तणातणी सुरू आहे. यासाठी दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची चर्चा सुरू आहे. वाटाघाटी सुरू असून, त्यांचे तिकीट निश्चित होईल, तसेच लवकरच पुढची यादी येईल, असा विश्वास भाजपचे नेते व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

माढा मतदारसंघात भेटीनंतर मंत्री महाजन (Girish Mahajan) यांनी काल (सोमवार) खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस (Jalmandir Palace Satara) या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी तासभर बंद दाराआड चर्चा केली. यानंतर श्री. महाजन यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

मंत्री महाजन म्हणाले, ‘‘काल मी माढा मतदारसंघातील (Madha Constituency) नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आलो होतो. तेथील चर्चा झाल्यानंतर मी उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आलो. उदयनराजेंचे आणि माझे कॉलेजपासूनचे जुने संबंध आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. यासाठी महाराजांचाही पक्षाला फायदा झाला पाहिजे, तसेच निवडणुकीत त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या नावाचे एक वलय आहे. त्यांची पक्षाला जास्तीतजास्त मतदान होण्यासाठी उपयोग करून घेता येईल. याबाबत आमच्यात चर्चा झाली. लोकसभेच्या प्रचारासाठी महाराज महाराष्ट्रात कुठे कुठे वेळ देणार, याची सविस्तर चर्चा आम्ही केली.’’

भाजपच्या मागील दोन उमेदवारांच्या यादीत उदयनराजेंच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत, नेमके काय कारण आहे? या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले, ‘‘आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. उदयनराजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही किंवा त्यांचे तिकीट नाकारण्याचा विषय नाही. सध्या जागा वाटपावरून तीन पक्षांत तणातणी सुरू आहे. त्यांना तिकीट निश्चित आहे; पण दिल्लीतून आमचे सगळे ठरते. तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाशी बोलत आहेत. उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्ड सगळे ठरवते. सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. लवकरच पुढील निर्णय होईल, आणखी एक यादी येईल.’’

माढ्यातील तिढा सुटला का? या प्रश्नावर महाजन म्हणाले, ‘‘माढ्यातील प्रश्नाबाबत मी विजयसिंहदादांना भेटलो. तेथील कार्यकर्त्यांचा आग्रह होता. खूप गर्दीही होती. निंबाळकरांबाबत तणाव आहे. तिकिटाबाबत वेगळे म्हणणे होते; पण आमची सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस चर्चा करून निर्णय घेतील.’’

उदयनराजेंचे तिकीट डावलले, तर मराठा समाज नाराज होईल, या प्रश्नावर महाजन म्हणाले, ‘‘तशी वेळ येणार नाही. तिकीट नाकारले असे का सांगता?’’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. भाजपच्या पहिल्या यादीत उदयनराजेंचे नाव नाही यावर, मंत्री महाजन म्हणाले, ‘‘गडकरी यांचेही पहिल्या यादीत नाव नव्हते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी गडकरींबाबत किती आकांडतांडव केला होता. ते तर जुने नेते आहेत. प्रत्येकाची वेळ असते. आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड आहे. एकट्या भाजपची ही जबाबदारी असती, तर मध्यप्रदेश, गुजरातसारखे असते तर वेगळा विषय होता; पण आता लवकरच हा निर्णय होईल.’’

मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. यावर मंत्री महाजन म्हणाले, ‘‘आपल्याकडे लोकशाही आहे. कुणालाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही.’’

वेगळ्या कारणांसाठी भेटायला आलो

प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी भाजपकडून संकटमोचक म्हणून तुम्हालाच चर्चेला पाठवले जाते. याबाबत मंत्री महाजन म्हणाले, ‘‘प्रत्येक प्रश्नाचा तिढा सोडवण्यासाठी भूमिका घ्यावी लागते. मी आज वेगळ्या कारणांसाठी भेटायला आलो आहे. भेटल्यामुळे चर्चा, प्रश्न सुटत असतात. मार्ग निघत असतो. मी चर्चा करण्याचे काम करतो. मात्र, इथला हा प्रश्नच नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT