Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde Jayant Patil esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

राज्यात भाजपचा वारू शरद पवारच (Sharad Pawar) रोखू शकतात, हे माहीत झाल्यानेच मोदी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत.

सकाळ डिजिटल टीम

''निष्ठावान विरुद्ध गद्दार तसेच नैतिक विरुद्ध अनैतिक मूल्यांच्या विरोधात ही निवडणूक आहे. लोकशाही टिकण्यासाठी सातारा जिल्ह्यात तुतारीच वाजली पाहिजे.''

पुसेगाव : भाजपला (BJP) देशातील लोकशाही मोडून हुकूमशाही आणायची आहे. त्यांना संविधान आणि घटना बदलायची आहे. जनतेला त्यांचा हा डाव समजला असल्याने चारशे पारची वल्गना करणारे आता दोनशेपर्यंतही पोचणार नाहीत. राज्यात भाजपचा वारू शरद पवारच (Sharad Pawar) रोखू शकतात, हे माहीत झाल्यानेच मोदी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. सातारा मतदारसंघातील वातावरण पाहता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) खासदार झाल्यात जमा आहेत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेस माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, हणमंत चवरे, प्रताप जाधव, सचिन मोहिते, किरण माने, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच पुसेगाव आणि खटाव जिल्हा परिषद गटातील मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली आहे. मात्र, निकालानंतर पवारच महाराष्ट्राचा आत्मा आहेत, हे सिद्ध होईल. भाजपच्या काळात देश कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. सर्वत्र महागाई, बेरोजगारी वाढली आहे. मी जलसंपदामंत्री असताना शशिकांत शिंदे यांच्या पाठपुव्यामुळे जिहे-कठापूर योजनेला निधी मिळाला. मेडिकल कॉलेजसाठी जलसंपदा विभागाची जागा वैद्यकीय विभागाला देण्याचा निर्णयही आम्हीच घेतला.’’

राजेश टोपे म्हणाले, ‘‘मोदी गॅरंटी फसवी आहे. भाजपचे सर्वत्र जुमले सुरू आहेत. देशात अराजकता माजली आहे. सातारा जिल्ह्याने देशाला यशवंत विचार, पुरोगामित्व, समतेचा विचार आणि नीतिमूल्यांचे राजकारण दिले आहे. सध्या सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. मान गादीला; पण मत तुतारीलाच देण्यासाठी जनता सरसावली आहे.

निष्ठावान विरुद्ध गद्दार तसेच नैतिक विरुद्ध अनैतिक मूल्यांच्या विरोधात ही निवडणूक आहे. लोकशाही टिकण्यासाठी सातारा जिल्ह्यात तुतारीच वाजली पाहिजे. कोरेगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा बदला घ्या.’’ सातारा मेडिकल कॉलेजच्या मंजुरी पत्रावर आरोग्यमंत्री म्हणून माझी सही आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘इथल्या जनतेने सासूरवास भोगला आहे. त्याचा वचपा या निवडणुकीत निघणार आहे. माझे ॲफेडेव्हिट घेऊन काही कपटी लोक फिरत आहेत. पायगुण अपशकुनी असलेले जनतेला धमक्या देत पाणी देणार नसल्याची भाषा बोलत आहेत.’’ या वेळी अजित चिखलीकर, डॉ. सुरेश जाधव, छाया शिंदे, सागर साळुंखे यांचीही भाषणे झाली. पक्षाचे तालुकाध्यक्ष जोतीनाना सावंत यांनी स्वागत केले. सागर साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. संदीप जाधव यांनी आभार मानले.

जनतेने घेतली लढाई हाती

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘सत्तेची मस्ती आलेल्यांना ब्राझीलला पाठवणार आहे. निवडणुकीत माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर किती आणि कोणते आरोप आहेत, हे सांगायला मला भाग पाडू नका. तत्त्वाची लढाई जनतेनेच हाती घेतल्याने भाजपचा माज या निवडणुकीत उतरणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT