Marathwada Lok Sabha ELections 2024 Esakal
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha election result 2024 : मराठवाड्याचा किंगमेकर कोण? शरद पवार की मनोज जरांगे? महाराष्ट्राचा निकाल बदलवणारे 'ते' चार शब्द...

Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी उपोषणं केली, परंतु अपेक्षेप्रमाणे हाताशी काही आले नाही. मराठ्यांचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा किंवा सगेसोयरे कायदा लागू करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी त्यांची मागणी होती. एकनाथ शिंदेंनी आश्वासन देऊन पाळलं नाही, अशी मराठ्यांची भावना आहे. त्यामुळे जरांगेंच्या मेसेजचा योग्य तो अर्थ काढून मराठा समाजाने भाजपला आणि पर्यायाने एनडीएला पराभव दाखवून दिला.

संतोष कानडे

Beed Lok sabha election results : लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला धक्का देणारा आहे. महाराष्ट्रात एनडीएला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर इंडिया आघाडीला ३० जागा जिंकता आल्या. त्यातही मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी केवळ एक जागेवर एनडीएला यश आलेलं आहे. तीही जागासुद्धा शिवसेनेची आहे. उर्वरित आठ जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवलं.

बीडच्या जागेची राज्यामध्ये भलतीच चर्चा झाली. त्याचं कारण मुंडे बहीण-भावाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवाय मराठा-ओबीसी फॅक्टरमुळे नेमकं काय होणार? याचा अचूक अंदाज कुणालाही बांधता येत नव्हता. चुरस निर्माण झालेल्या लढतीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला.

मनोज जरांगेंचा चार शब्दांचा एक मेसेज अन्...

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक मेसेज मराठा समाजाला दिला होता. त्याच मेसेजमुळे मराठवाड्यासह राज्यभरात भाजपची दाणादाण उडाली. ''ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा'' हा तो मेसेज होता. मराठा समाजाने याचा जसा अर्थ काढायला होता तसा काढला आणि त्याचे परिणाम निकालातून दिसून आले.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी उपोषणं केली, परंतु अपेक्षेप्रमाणे हाताशी काही आले नाही. मराठ्यांचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा किंवा सगेसोयरे कायदा लागू करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी त्यांची मागणी होती. एकनाथ शिंदेंनी आश्वासन देऊन पाळलं नाही, अशी मराठ्यांची भावना आहे. त्यामुळे जरांगेंच्या मेसेजचा योग्य तो अर्थ काढून मराठा समाजाने भाजपला आणि पर्यायाने एनडीएला पराभव दाखवून दिला.

मराठवाड्यामध्ये आठपैकी सात खासदार मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. लातूरमधून शिवाजी काळगे हे जंगम समाजाचे काँग्रेस उमेदवार ६१ हजार ८८१ मतांनी निवडून आले आहेत. उर्वरित सात तालुक्यांमध्ये मराठा उमेदवार विजयी झाले. यामध्ये नांदेडमधून वसंत चव्हाण, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, परभणीमधून संजय जाधव, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टेकर, जालन्यातून कल्याण काळे आणि बीडमधून बजरंग सोनवणे विजयी झाले.

सत्तेविरोधात लाटेचा विरोधकांना फायदा

मराठवाड्यात अथवा महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चालला की शरद पवार फॅक्टर? अशा चर्चा सुरु आहे. मुळात भाजपच्या सत्तेविरोधात लोकांमध्ये रोष होता. त्यातही मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यभरात संतापाची लाट होती. त्या लाटेचा परिणाम सत्तेधाऱ्यांना भोगावा लागला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गाजलेल्या सभा आणि कमी वेळेत मशाल अन् तुतारी हे चिन्ह सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं दाखवलेलं कसब; यामुळे विजयाला किनारी सोनेरी झाली.

विशेष म्हणजे मुस्लिमांमध्ये असलेली अस्थिरता, संविधान बदलाच्या प्रचारामुळे दलितांमध्ये निर्माण झालेला रोष आणि मराठा आरक्षणामुळे नाराज असेलला मराठा समाज. या तीन फॅक्टर्सनी मराठवाड्यात काम केलं आणि भाजपला पराभव स्वीकारावा लागला.

महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

NDA- 17

BJP - 09

Shivsena (Eknath Shinde) - 07

NCP (Ajit Pawar) - 01

INDIA- 30

Congress- 13

Shivsena (Uddhav Thackeray) - 09

NCP (Sharad Pawar)- 08

Independent- 01 (congress)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT