Maval Lok Sabha 2024 eSakal
लोकसभा २०२४

Maval Loksabha: पुणे-मुंबईतील सेतू अन् दोन संस्कृतींचा मिलाफ; सांगवी ते घारापुरीपर्यंत पसरलेला मावळ मतदारसंघ, ओळख मतदारसंघाची

मतदारसंघ पुनर्रचनेमुळे १९ फेब्रुवारी २००८ रोजी मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिली निवडणूक २००९ मध्ये झाली.

पीतांबर लोहार

पुणे आणि रायगड जिल्ह्यात मावळ लोकसभा मतदारसंघ विभागला आहे. पुण्याजवळील सांगवी-दापोडीपासून मुंबई जवळच्या घारापुरी लेण्यांपर्यंतचे क्षेत्र या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्याची भौगोलिक रचना व हवामान भिन्न आहे. मतदारांची बोली भाषा व संस्कृतीही भिन्न आहे. जीवनशैली, राहणीमान वेगवेगळे आहे. सह्याद्री पर्वताच्या पठारावरील आणि पायथ्याच्या परिसरातील दोन भिन्न संस्कृतींचा मिलाफ म्हणजे मावळ मतदारसंघ आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेमुळे १९ फेब्रुवारी २००८ रोजी मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिली निवडणूक २००९ मध्ये झाली. भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ आणि महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली, पनवेल, उरण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश ‘मावळ’मध्ये आहे.

पिंपरी-चिंचवड, मावळसह उरण, पनवेल भागात देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नागरिक अधिक आहेत. शिवाय, मावळ खोऱ्यातील व कोकण पट्टीतील स्थानिकांची भाषा वेगळी आहे. संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज वेगवेगळे आहेत. भौगोलिक रचना कुठे सपाट पठाराची तर, कुठे डोंगर-दऱ्यांची आहे. कुठे नद्यांचे खोरे आहे तर कुठे समुद्र किनारा आणि खाडीचा भाग आहे. त्यामुळे येथील मतदारांच्या विकासाबाबतच्या अपेक्षाही वेगळ्या असून त्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत.

दृष्टिक्षेपात मतदारसंघाची वैशिष्ट्ये...

  • मावळ तालुक्यात भातशेती, दुग्ध व्यवसाय

  • पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी असून, नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक भागातील नागरिकांचे वास्तव्य

  • पर्वतीय दुर्गम भागात आदिवासी बांधवांच्या वस्ती

  • पर्वत पायथ्यापासून अरबी समुद्रापर्यंतचा भाग असून, उरणमध्ये मासेमारी प्रमुख व्यवसाय

  • पुणे शहराला लागून असलेल्या दापोडी- सांगवीपासून मुंबईला लागून असलेल्या घारापुरी, पनवेलपर्यंतचा भाग

  • लोणावळा, खंडाळा, माथेरान थंड हवेची ठिकाणे आणि विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची असे किल्ले

  • जगात गुलाब व इंद्रायणी तांदूळ पिकवणारा मावळ तालुका मुख्य घटक

  • मुंबईला वीज व पाणी पुरवणारी धरणे मतदारसंघात आहेत

  • जगप्रसिद्ध नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, घारापुरी, कोंडाणा, बेडसे, घोरावडेश्वर, भाजे व कार्ला लेणी, कर्नाळा पक्षी अभयारण्य

  • पिंपरी, चिंचवड, तळेगाव दाभाडे, पाताळगंगा, तळोजा औद्योगिक क्षेत्र अर्थात एमआयडीसी

  • पवना, मोरबे, लोणावळा, आंद्रा, भुशी, जाधववाडी, वडिवळे, तुंगार्ली, पळसदरी, ठोकळवाडी, वळवण धरणे

  • पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर व मुंबई-गोवा महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) प्रशस्त मार्ग, मुंबई-पुणे व मुंबई-पणजी लोहमार्ग

  • पिंपरी-चिंचवड व पनवेल महापालिका; लोणावळा, तळेगाव दाभाडे, कर्जत, माथेरान, खोपोली, उरण नगरपरिषदा; वडगाव, खालापूर, देहू नगरपंचायत; देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

  • संत तुकाराम महाराज यांचे देहू, भंडारा डोंगर, महासाधू मोरया गोसावी यांचे चिंचवड, आई एकवीरा देवीचे कार्ला, गगनगिरी महाराज समाधीस्थळ खोपोली, अष्टविनायकातील वरदविनायकाचे महड आदी तीर्थक्षेत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT