Pune Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Pune Loksabha Constituency : एका दिवशी दोन हायव्होल्टेज सभा ; मोदी, पवार अन् ठाकरे सोमवारी पुण्याच्या मैदानात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभा एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. २९) सायंकाळी पुण्यात होणार आहेत. शहरात एकाच दिवशी मोठ्या नेत्यांच्या सभा होण्याचा योगायोग पहिल्यांदाच आला आहे. त्यांच्या तोफा कशा धडाडणार? याकडे पुणेकरांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे; तर चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यात अनुक्रमे बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा वारजे येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यानंतर दोनच तासांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी यांची टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता सभा होईल. मोदी, पवार आणि ठाकरे एकाच दिवशी दोन ठिकाणांवरून शहरात मतदारांना साद घालणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘सुळे यांच्या प्रचारासाठी पवार व ठाकरे यांची सभा शहरात होणार होतीच. दोन्ही नेत्यांच्या सभेसाठी २९ एप्रिलचा दिवस निश्चित झाला आहे. त्यानुसार सभेचे नियोजन सुरू आहे. सभा सायंकाळी पाच वाजता होईल. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.’’

सभेपूर्वी मोदींचा रोड शो

सभेपूर्वी मोदी यांचा पुण्यात रोड शो होणार असून, कार्यकर्त्यांना तयारीची सूचना दिली आहे. लातूर येथील सभा संपल्यानंतर मोदी पुण्यात येणार आहेत. विमानतळावरून सभास्थळी जाताना जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकापासून ते डेक्कन, टिळक चौक, टिळक रस्ता, स. प. महाविद्यालयदरम्यान रोड शो होईल. रोड शो बंद गाडीऐवजी उघड्या जीपमधून होण्याची शक्यता आहे; पण अद्याप त्यास भाजपमधील सूत्रांकडून दुजोरा दिलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Indian Air Force च्या Air Show मध्ये चार जणांचा मृत्यू, ९६ जण जखमी, घटनेनं खळबळ

IND vs BAN: भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्ह्युवमध्ये अडकले बांगलादेशी फलंदाज! सूर्याच्या शिलेदारांसमोर १२८ धावांचे लक्ष्य

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE: सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता, वाचा ग्रँड फिनालेमध्ये नेमकं काय काय घडलं

SCROLL FOR NEXT