Election Commission esakal
लोकसभा २०२४

Election Commission: निवडणूक संहिता उल्लंघनाच्या 79 हजार हून अधिक तक्रारी दाखल, निवडणूक आयोगाची माहिती

Election Commission: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आचार संहिता उल्लंघनाचे प्रकार देखील वाढत आहेत. मात्र निवडणूक आयोग कठोर कारवाई करत आहे. निवडणूक आयोगाच्या cVigil तक्रारी करता येतात.

Sandip Kapde

Election Commission 2024:  निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहीता उल्लंघनाचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाकडे cVigil ॲपद्वारे 79 हजार हून अधिक  तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 99 टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

बेकायदेशीर बॅनर होर्डिंगबाबत 58,500 तक्रारी दाखल करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे, तर 1,400 तक्रारी पैसे, भेटवस्तू आणि दारूच्या वितरणाबाबत आहेत. तीन टक्के तक्रारी मालमत्तेच्या नुकसानीच्या होत्या. गुंडगिरीच्या 535 तक्रारींपैकी 529  तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. निषिद्ध कालावधी नंतरच्या प्रचाराशी संबंधित एक हजार तक्रारी होत्या.

16 मार्च रोजी सात टप्प्यातील निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती आणि मतदान 19 एप्रिलपासून सुरू होईल, जे 1 जूनपर्यंत चालेल. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
(Election Commission News in Marathi)

बंदुकांचे प्रदर्शन आणि धमकावण्याबाबत 535 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 529 निराकरण करण्यात आले आहे. शिवाय, 1,000 तक्रारी निषिद्ध कालावधीच्या पलीकडे प्रचारासाठी होत्या, ज्यात परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ स्पीकर्स वापरल्याचा समावेश आहे.

cVIGIL हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे ज्यावर नागरिकांना राजकीय गैरवर्तनाच्या घटनांच्या तक्रारी करता येतात.  मतदान पॅनेलने म्हटले आहे की सीव्हीआयजीआयएल एक प्रभावी साधन बनले आहे आणि निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT