मुरलीधर मोहोळ  murlidhar mohol facebook
लोकसभा २०२४

Muralidhar Mohol : मुरलीधर मोहोळ आता खासदार म्हणून संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व करणार

घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांनी ओंकारेश्‍वर मंदिराच्या जवळ रसवंती गृह सुरु केले होते

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः कुस्तीपट्टू, भाजपचा बूथ स्तरापासून काम करत आलेला कार्यकर्ता अन् पुण्याचे माजी महापौर भूषविलेले मुरलीधर मोहोळ हे आता खासदार म्हणून संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मुळशीतील मुठा गावातून पुण्यात येऊन स्थिरावल्यानंतर ज्यांच्या राजकीय कारकिर्दीत आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

मोहोळ यांचे वडील नोकरीनिमित्ताने आले. सुरुवातीला त्यांनी मंडईमध्ये हमाली केली, त्यानंतर पुण्यात एका बँकेमध्ये सेवक म्हणून कार्यरत होते. मुरलीधर मोहोळ इयत्ता दुसरी पर्यंतचे शिक्षण मुठा गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर १०वी पर्यंतचे शिक्षण भाव हायस्कूल टिळक रस्ता येथे घेतले. याच काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांनी ओंकारेश्‍वर मंदिराच्या जवळ रसवंती गृह सुरु केले होते. तेथे त्यांनी वडिलांना ते मदत देखील करत.

मुरलीधर मोहोळ हे उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर येथे गेले. तेथे त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. तसेच कुस्तीची आवड असल्याने कोल्हापूर येथे आखाड्यात प्रशिक्षण घेतले. यावेळी त्यांनी विविध स्पर्धांपर्यत भाग घेतले. राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी चमक दाखवली.शिक्षण संपल्यानंतर पुन्हा पुण्यात आल्यानंतर श्री साई मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गणेशोत्सवातील कार्यकर्ता म्हणून काम केले. त्याच वेळी भाजपचे काम करताना जय भवानीनगर, केळेवाडी या भागाचा बूथ प्रमुख म्हणून काम केले. २००२ला महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. २००६ ला महापालिकेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याने नगरसेवक होण्याची संधी मिळाली. त्यानंतर २००७ ते २०१२, २०१७ ते २०२२ असे तीन वेळा मोहोळ हे नगरसेवक झाले. २००९ ला त्यांनी खडकवासला विधानसभा निवडणूकही लढवली होती.

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मोहोळ हे स्थायी समिती अध्यक्ष झाले. त्यांनी दोन अर्थसंकल्प मांडले. त्यानंतर ते अडीच वर्ष पुण्याचे महापौरपद भूषविले. सध्या ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. पक्ष संघटनेसह लोकप्रतिनिधी म्हणून मोहोळ यांनी काम करत आता संसदेत पुणेकरांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT