evm machine esakal
लोकसभा २०२४

Nanded Lok Sabha: मतदान करायला आला अन् ईव्हीएमवर घातले कुऱ्हाडीचे घाव! नांदेडमधील धक्कादायक घटना

केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर मतदान करण्याऐवजी त्यानं ईव्हीएममशिनवरच कुऱ्हाडीनं घाव घातले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर एका तरुणानं ईव्हीएममशिनची कुऱ्हाडीनं तोडफोड केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. (Nanded Lok Sabha Election 2024 young man came to vote and damage EVM with ax)

माध्यमातील वृत्तानुसार, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ या गावात हा प्रकार घडला असून भय्यासाहेब येडके हा तरुण या मतदारसंघात मतदानासाठी दाखल झाला. त्यानं आपल्यासोबत लपवून कुऱ्हाड आणली होती. केंद्रामध्ये दाखल झाल्यानंतर मतदान करण्याऐवजी त्यानं ईव्हीएममशिनवरच कुऱ्हाडीनं घाव घातले. यामुळं मशिनचं नुकसानं झालं. (Latest Marathi News)

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं. पण त्यानं हे कृत्य का केलं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. पण या घटनेमुळं या तरुणामध्ये निवडणुकीबद्दल एकूणच राग असल्याचं दिसून आलं आहे. अधिक चौकशीनंतर याच्यामागचं नेमकं कारण समजू शकेल. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT