Narendra Modi becoming PM for the third time prediction esakal
लोकसभा २०२४

मोदींच्या तिसऱ्यांदा PM होण्याच्या नुसत्या अंदाजाने पाकिस्तान हादरला! भारत 'घुसकर मारेंगे' धोरणावर वाटचाल करण्याची भिती

Sandip Kapde

लोकसभा निवडणूकांचे निकाल उद्या (4 जून, मंगळवार) जाहीर होणार आहेत, परंतु त्याआधीच सर्व एक्झिट पोलने भाकीत केले आहे की देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा पंतप्रधान होणार. अनेक माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल सर्वेक्षणात एनडीएला बहुमत मिळणार आहे. तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळतील आणि इतरांना 35 जागा मिळतील असा अंदाज आहे.

एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर चीन आणि पाकिस्तानने प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतासोबतचे संबंध सुधारतील अशी आशा चीनने व्यक्त केली आहे, तर पाकिस्तान मात्र पूर्णपणे घाबरला आहे. त्याविरोधात नरेंद्र मोदी आक्रमक धोरण स्वीकारतील, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास शेजारी देशांप्रती त्यांचे सरकारचे काय धोरण असेल याची चर्चा पाकिस्तानात सुरू आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी एका टीव्ही चॅनलवर म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवणाऱ्या एक्झिट पोलने पाकिस्तान हादरला आहे. पंतप्रधान मोदी आपल्याविरोधात आक्रमक धोरण स्वीकारतील, अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे.

एजाज चौधरी म्हणाले, ट्रॅक रेकॉर्डवरून असे दिसून येते की मोदी निवडणूक जाहीरनामा लागू करतात. त्यामुळे यावेळी ते भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करणार असून पाकिस्तानबाबत आक्रमक धोरण स्वीकारणार आहेत. ज्याचा उल्लेख ते 'घुसकर मारेंगे' या वाक्याने करत आहेत.

2019 च्या निवडणुकीत त्यांनी कलम 370 चा उल्लेख केला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ते हटवले. यावेळी स्पष्टपणे त्यांचे लक्ष्य फॅसिस्ट विचार असलेले वेगाने वाढणारे हिंदू राष्ट्र आहे. पाकिस्तानातील कुणालाही काही फरक पडत नाही पण त्यामुळे भारतातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांसाठी जागा कमी होईल, जी आधीच खूपच कमी आहे. दुसरे म्हणजे, ते शेजारी राष्ट्रांसाठी विशेषतः पाकिस्तानसाठी आक्रमक असतील. अशा परिस्थितीत पाकिस्तानने पूर्ण तयारी करायला हवी, असे एजाज चौधरी म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT