Narendra Modi esakal
लोकसभा २०२४

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

संतोष कानडे

PM Narendra Modi : कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मोदींनी यावेळी राहुल गांधींसह संपूर्ण इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे त्यांनी सावरकरांचा मुद्दा उपस्थित करुन राहुल गांधींना खुलं चॅलेंज दिलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे शहजादे कायम सावरकरांच्या विरोधात बोलायचे. परंतु जेव्हापासून निवडणुका लागल्यात तेव्हापासून त्यांनी सावरकरांबद्दल शब्दही काढला नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वीर सावरकरांच्या बाजूने पाच वाक्यं बोलली पाहिजेत.

मोदी पुढे म्हणाले की, राहुल गांधींच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितल्यामुळे ते सावरकरांवर बोलत नाहीत. कारण निवडणूक जिंकायची असेल तर या विषयावर बोलू नका, असं त्यांना सांगण्यात आलंय. हेच लोक याकूब मेमनची कबर सजवतात परंतु राम मंदिराचं निमंत्रण फेटाळून लावतात. इंडी आघाडीचे लोक राम मंदिराबाबत अपमानजनक भाषा बोलतात, असाही टोला मोदींनी लगावला.

मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस कधीच विकासाच्या गोष्टी करीत नाही. काँग्रेस केवळ हिंदू-मुसलमान करत आहे. त्यांच्यासाठी विकास म्हणजे त्यांचाच विकास जे त्यांना वोट देतात. ते म्हणतात, मोदीने हिंदू-मुसलमान केलं. परंतु मी ज्यांनी हिंदू-मुसलमान केलं त्यांचा कच्चाचिठ्ठा काढत आहे. काँग्रेसचं सरकार असताना ते खुलेआम म्हणत होते, देशाच्या संसाधनावर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. हे डॉक्टर मनमोहर सिंहांनी म्हटलं होतं, मी त्या बैठकीला होतो. त्याचा मी विरोध केला होता. काँग्रेसवाले कीतीही ओरडले तरी उपयोग नाही, सगळं आज उपलब्ध असल्याचं मोदींनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT