Narendra Modi  sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : ‘ते’ राम मंदिरावर बुलडोझर चालवतील;मोदींची ‘सप’, ‘काँग्रेस’वर टीका, ‘कमळा’ला मतदानाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

बाराबंकी (उत्तरप्रदेश) : ‘‘काँग्रेस आणि समाजवादी पक्ष सत्तेमध्ये आले तर ते राममंदिरावर बुलडोझर घालतील. बुलडोझर कोठे घालावा याचे प्रशिक्षण त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घ्यायला हवे. इंडिया आघाडी अस्थिरता निर्माण करण्यासाठीच निवडणूक लढवीत असून पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे ती कोसळून पडते आहे,’’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत बोलताना केला.

भाजप सलग तिसऱ्यांदा विजयी होईल असे सांगताना मोदी म्हणाले,‘‘ आम्ही, महिला, गरीब, युवक आणि शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले. आज बाराबंकी आणि मोहनलालगंजचा आशीर्वाद घेण्यासाठीच येथे आलो आहे. आता ४ जूनची तारीख फार दूर राहिलेली नाही. आज केवळ देशच नाहीतर अवघ्या जगाला माहिती झाले आहे की मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार आहे.

एकीकडे ‘एनडीए’ आघाडी राष्ट्रहितासाठी संघर्ष करत असताना ‘इंडिया’ आघाडी मात्र अस्थिरता निर्माण करण्यासाठी मैदानात उतरली आहे. जसजशी ही निवडणूक पुढे जाऊ लागली तशी इंडिया आघाडी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागली. तुम्हाला काम करणारा, तुमच्या भागाचा विकास करणारा खासदार हवा आहे. त्यासाठी तुमच्यासमोर केवळ कमळाचाच एकमेव पर्याय आहे. ‘शंभर सीसी’च्या इंजिनाकडून तुम्ही ‘एक हजारसीसी’च्या क्षमतेची अपेक्षा करू शकता का? केवळ सशक्त सरकारच विकास घडवून आणू शकते. हे सगळे भाजपचे सरकार करू शकते.’’

ते मंदिर पाडतील

राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘समाजवादी पक्षाचे एक वरिष्ठ नेते राम मंदिर आणि रामनवमी काही कामाची नसल्याचे म्हणतात. त्याच वेळी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाच्या राम मंदिराबाबतच्या निकालात हेराफेरी झाल्याचा आरोप करतो.

आता पुन्हा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची सत्ता आल्यास ते रामलल्ला तंबूमध्ये पाठवून मंदिराला पाडून टाकतील.’’ आता ‘रामकाज’ वरून ‘ राष्ट्रकाज’वर जाण्याची वेळ आली आहे. रामाची प्रेरणाही राष्ट्रासाठीची प्रेरणा असून मी तुमच्या हक्कासाठीच ‘चारशे’ पारचे आवाहन करतो आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT