pm modi or mamata banerjee rise vote bank threat to religious place  Sakal
लोकसभा २०२४

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

मोदी या वेळी म्हणाले, ‘‘तृणमूल काँग्रेसने इतकी खालची पातळी गाठली आहे, की रामकृष्ण मिशन, इस्कॉन आणि भारत सेवाश्रम संघाविरुद्ध अपप्रचार करत सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुरुलिया : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. या सामाजिक-धार्मिक संस्थांना मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी धमक्या दिल्या जात आहेत, असे त्यांनी प. बंगालमधील पुरुलिया येथील सभेत सांगितले.

मोदी या वेळी म्हणाले, ‘‘तृणमूल काँग्रेसने इतकी खालची पातळी गाठली आहे, की रामकृष्ण मिशन, इस्कॉन आणि भारत सेवाश्रम संघाविरुद्ध अपप्रचार करत सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संस्थांना धमकावीत आहेत. आपल्या मतपेढीचे तुष्टीकरण करण्यासाठी त्या अशा धमक्या देत आहेत.’’

प. बंगालमधील आरामबाग मतदारसंघात गोघाट येथील प्रचारसभेत बॅनर्जी यांनी या संस्थांविरुद्ध वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, रामकृष्ण मिशन आणि सेवाश्रम संघाचे काही साधू भाजप नेत्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. मंदिरांची देखभाल करणारे महान आध्यात्मिक कार्य करत आहेत. मात्र, प्रत्येकजण हे करत नाही. आम्ही साधूमहंतांचा आदर करतो.

भ्रष्टाचारी तुरुंगात जातील

पंतप्रधानांनी या वेळी तृणमूलसह ‘इंडिया’ आघाडीवरही निशाणा साधला. ते म्हणाले, की कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला सोडणार नाही, हीच मोदींची गॅरंटी आहे. येत्या चार जूननंतर केंद्रात नवीन सरकार सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचारी व्यक्ती आपले उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवतील. लोकसभा निवडणुकीनंतर या कारवाईला वेग देण्यात येईल.

‘काँग्रेसच्या शहजाद्यांची भाषा नक्षली’

काँग्रेसच्या शहजाद्यांकडून (राहुल गांधी) नक्षलवादी भाषेचा वापर होत असल्याने या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांत कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी उद्योगपती ५० वेळा विचार करतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा तसेच लोकसभेची जागा वडिलोपार्जित मालमत्ता समजल्याचाही आरोप केला. लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या शहजाद्यांची भाषा पाहता कोणताही उद्योगपती या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात गुंतवणुकीपूर्वी ५० वेळा विचार करेल. नक्षलवाद्यांकडून बोलली जाणारी भाषा काँग्रेसचा शहजादा वापरत असून नवनवीन पद्धतींद्वारे पैसे उकळत आहे. या शहजादांकडून वापरल्या जाणाऱ्या उद्योगविरोधी भाषेशी आपण सहमत आहोत का, हे काँग्रेसचे मुख्यमंत्री व ‘इंडिया’ आघाडीने स्पष्ट करण्याचे आव्हान मी देत आहे.’’ मोदी यांचा स्पष्ट रोख राहुल गांधी यांच्याकडे होता.

मम्मीच्या मतदारसंघाकडे धाव

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयाची खिल्ली उडवित मोदी म्हणाले, की हा माझ्या मम्मीचा मतदारसंघ असल्याचे सांगत शहजाद्याने रायबरेलीत धाव घेतली.

अगदी आठ वर्षांचा मुलगाही असे करत नाही. लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेस सरकारच्या काळात देशातील सुमारे १८ हजार गावांची अवस्था १८ व्या शतकातील गावांप्रमाणे होती, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT