मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात अर्थात घाटकोपर भागात ते अडीच किलोमीटरचा 'रोड शो' करणार आहेत. रात्री ८ वाजता या रोड शोला सुरुवात होणार आहे. त्यासाठी वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. (PM Modi to hold roadshow in Mumbai Ghatkopar on May 15 here traffic advisory)
लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरील श्रेयस सिनेमापासून मोदींच्या 'रोड शो'ला सुरुवात होणार असून गांधी मार्केटपर्यंत तो असणार आहे. इथल्या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा उभे आहेत. या ठिकाणी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या इतर पाच मतदासंघांसाठीही याच दिवशी मतदान पार पडणार आहे. दिंडोरी इथं प्रचार सभेला संबोधित केल्यानंतर कल्याणमध्येही मोदींची सभा पार पडणार आहे. त्यानंतर रात्री मुंबईतील घाटकोपर इथं त्यांचा 'रोड शो' होणार आहे.
वाहतुकीत 'असे' असतील बदल
मुंबई वाहतूक पोलिसांच्या दिशानिर्देशांनुसार, बुधवारी १५ मे रोजी दुपारी २ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत गांधीनगर चौकापासून नौपाडा चौकापर्यंत लाल बहादूर शास्त्री रोडवर एकाही वाहनाला प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच मेघराज चौक ते आरबी कदम चौकापर्यंत माहुल-घाटकोपर रस्त्यावरही वाहनांसाठी प्रवेश बंदी असेल.
तसेच अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील घाटकोपर चौक ते साकीनाका चौक, गुलाटी पेट्रोल पंप चौक ते हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स रोड त्याचबरोबर गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्टेशन (पश्चिम) सर्वोदय चौकापर्यंत रस्ता बंद असेल.
पर्यायी मार्ग असे असतील
तर पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांना पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-कुर्ला रोड, साकी विहार रोड, एमआयडसी सेन्ट्रल रोड, चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड, सायन-वांद्रे लिंक रोड आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.