PM Narendra Modi criticized Congress leader Rahul Gandhi speech in Delhi  Sakal
लोकसभा २०२४

काँग्रेसला नेस्तनाबूत करा; रुद्रपूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

रुद्रपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील भाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकास्र सोडले. ‘‘काँग्रेस पक्ष आणीबाणी विचारसरणीचा पक्ष आहे. देशात आग लावण्याची भाषा करणाऱ्यांना या पक्षाच्या नेत्यांना वेचा आणि त्यांना नेस्तनाबूत करा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

तिसऱ्या कार्यकाळात भाजप सरकारची मोफत वीज देण्याची योजना असून प्रत्येक घरात सौर वीज आणण्याची योजना असल्याचेही ते म्हणाले, उत्तराखंडच्या उधमसिंहनगर जिल्ह्यातील रुद्रपूर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली.

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस बराच काळ सत्तेबाहेर राहिल्याने अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा पक्ष हतबल झाला असून ज्या ज्या ठिकाणी हे लोक उभे आहेत, त्यांचा पराभव करा. काँग्रेसच्या राजकुमारांनी धमकी दिली की, मोदींना तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर देशात भडका उडेल.

अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का? कदापि नाही, उलट तुम्ही त्यांना शिक्षा करा. काँग्रेस देशाला अराजकतेकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.’’भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहिल, असेही पंतप्रधान म्हणाले. भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवावे, असे तुम्हाला वाटत नाही का? भ्रष्टाचारी लोकांकडून मला धमक्या येत आहेत, बेछुट आरोप केले जात आहेत.

परंतु ते मला रोखू शकत नाहीत. भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहिल.देशाच्या जनतेने आपल्याला आणखी मजबूत करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. तिसऱ्या कालावधीत भारताला जगातील तिसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था करण्याची हमी देत आहे. मोदी यांच्या गॅरंटीचा अर्थ हमीची पूर्तता होय. प्रामाणिक इच्छा असेल तर विकास होतो. चांगल्या इच्छेतून केलेल्या कामाचे फळही चांगले मिळते, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी उपस्थित होते.

आणीबाणीची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा लोकशाहीवर विश्‍वास राहिलेला नाही. ते जनतेच्या कौलविरोधात जावून लोकांची माथी भडकविण्याचे काम करत आहे. साठ वर्षापर्यंत देशावर राज्य करणारे दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने देशात आग लावण्याची भाषा करत आहेत.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT