pm modi Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : पुन्हा ‘एनडीए’ सरकार येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येणार असे सांगतानाच या सरकारच्या काळात मोठ्या निर्णयांचा अध्याय लिहिला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजप मुख्यालयात सांगितले.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी यांनी पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सर्व प्रकारचा भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकला जाईल, ही मोदीची गॅरंटी असल्याचेही ते म्हणाले. रात्री सव्वाआठच्या सुमारास मोदी यांचे दीनदयाळ मार्गावरील भाजप मुख्यालयात आगमन झाले.

मोदी...मोदी...च्या घोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोदी यांनी उपस्थितांना अभिवादन केले. ‘जय जगन्नाथ’ असे म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत भाजपला जितक्या जागा मिळाल्या आहेत, तितक्या जागा तमाम विरोधी पक्षांना एकत्र येऊनही मिळाल्या नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ‘एनडीए’वर जनतेने जो विश्वास टाकला, आशीर्वाद दिला, त्यासाठी आपण देशवासीयांचे ऋणी आहोत. हा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा, भारताचा आणि ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राचा हा विजय आहे, असे मोदी म्हणाले.

कोणत्याही सरकारला सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्याची संधी १९६२नंतर पहिल्यांदाच मिळाली आहे, असे सांगत मोदी म्हणाले, ‘‘अरुणाचल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांत भाजपला घसघशीत विजय मिळाला असून या ठिकाणी काँग्रेसचा सुपडासाफ झाला. ओडिशात आम्ही स्वबळावर सरकार बनवत आहोत.

महाप्रभू जगन्नाथाच्या जमिनीवर पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री असेल. केरळमध्ये पहिल्यांदा भाजपचे खाते उघडले गेले आहे. तेलंगणमध्ये आमचे संख्याबळ दुप्पट झाले आहे. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल अशा राज्यात बहुतांश जागा भाजपने जिंकल्या आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आघाडीची शानदार कामगिरी झाली आहे.’’

‘‘आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावुक आहे. आई गेल्यानंतरची ही माझी पहिली निवडणूक होती. मात्र देशातील माता-भगिनींनी आईची कमतरता भासू दिली नाही,’’ असे उद्‍गार मोदी यांनी काढले.

‘‘राष्ट्र प्रथम ही भावना डोळ्यासमोर ठेवत अनेक महत्त्वाचे निर्णय मागील दहा वर्षांत घेता आले. कोरोनासारख्या संकटावर मात करता आली. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आगामी काळात पूर्ण शक्तीने काम केले जाईल. भ्रष्टाचाराविरोधातील लढाई कठीण होत चालली आहे. राजकीय स्वार्थासाठी भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण केले जात आहे. मात्र तिसऱ्या कार्यकाळात सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून काढले जाईल,’’ असे मोदी यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांची प्रेरणा

‘‘आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे वर्ष साजरे केले जाणार आहे. कितीही संकटे आली तरी अटल राहून शिवाजी महाराजांनी काम केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत आपण देशाची सेवा करीत राहू. कोणत्याही राज्यातील कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांना सोबत घेऊन काम करू,’’ असे मोदी म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही यावेळी भाषण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT