Mahavikas Aghadi sakal
लोकसभा २०२४

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीपासून डावेही दुरावले ; एकही जागा मिळत नसल्याने तीव्र नाराजी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी स्थापन करण्यात अग्रस्थानी असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) हे डावे पक्ष ‘इंडिया’ आघाडीपासून दुरावले आहेत. केरळ, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस डाव्यांच्याच विरोधात उभी राहत आहे, शिवाय महाविकास आघाडी डाव्या पक्षांना एकही जागा सोडण्यास तयार नसल्याने माकप आणि भाकपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे. इतकेच नव्हे तर आदिवासीबहुल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करावा, याबाबत माकपच्या केंद्रीय समितीमध्ये विचार केला जाणार असल्याचे समजते.

‘इंडिया’ आघाडीच्या रविवारी शिवाजी पार्क मैदानात झालेल्या सभेला माकप आणि भाकपचे प्रमुख नेते जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नव्हते. तसेच राज्यात महाविकास आघाडीने नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा माकपचे माजी आमदार कॅाम्रेड जे. पी. गावित यांना सोडावी, असा आग्रह धरला होता.

आघाडीच्या जागा वाटपात दिंडोरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. गेल्या आठवड्यात माकपचे नेते कॉम्रेड अशोक ढवळे यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवार यांची भेट घेऊन दिंडोरीच्या जागेसाठी आग्रह धरला होता. त्यावेळी पवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊया, असे आश्वसित केले होते. मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही जागा सोडू नये असा आग्रह धरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी डाव्या पक्षांना एकही जागा सोडणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने डाव्या पक्षांनी आघाडीपासून अंतर ठेवले आहे.

केरळमध्ये कम्युनिस्टांनाच आव्हान

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल अलप्पीमधून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी यांनी या वायनाडशिवाय सुरक्षित मतदारसंघ शोधायला हवा होता, असे डाव्यांचे मत होते. राज्यसभेचे खासदार असतानाही वेणुगोपाल केरळमधून निवडणूक लढवत असल्याने काँग्रेस कम्युनिस्टांनाच आव्हान देत असल्याने डावे पक्ष नाराज झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT