pune loksabha result esakal
लोकसभा २०२४

Pune Constituency Lok Sabha Election Result : धंगेकरांची जादू चाललीच नाही! पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा विजय

संतोष कानडे

Pune Lok Sabha Election Result 2024 : पुणे लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. चौथ्या टप्प्यात पुण्यासह नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

पुणे लोकसभेसाठी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत झाली. मनसेतून वंचितमध्ये गेलेले वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार होते. पुण्यामध्ये यावेळी साधारण ५३ टक्के मतदान झाले.

पुणे लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी १ लाख २३ हजार ३८ मतांचं मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. मोहोळ यांना ५ लाख ८४ हजार ७२८ मतं घेतली आहे. तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ४ लाख ६१ हजार ६९० मतं मिळाली आहेत.

2024 पुणे लोकसभा

मुरलीधर मोहोळ- ५,८४,७२८ (भाजप)

रवींद्र धंगेकर- ४,६१६९० (काँग्रेस)

वसंत मोरे- ३२०१२ (वसंत)

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,२३,०३८

पुण्यात कुणाचं पारडं जड होतं

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, पुणे छावणी, कसबा पेठ आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये सद्य स्थितीत भाजपचे चार आमदार आहेत तर काँग्रेसचा एक आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे.

२०१९ ची परिस्थिती

गिरीश बापट (भाजप) विजयी मते : ६,३२,८३५

मोहन जोशी (काँग्रेस) मते : ३,०८,२०७

अनिल जाधव (वंचित) मते : ६४,७९३

नोटा मते : ११,००१

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ३,२४,६२८

हे मुद्दे प्रभावी ठरले

  • संथ गतीने होणारा मेट्रोचा विस्तार

  • पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हवेतच आहे. निवडणुकांमध्ये केवळ चर्चा

  • शहरात अपुऱ्या पायाभूत सुविधा

  • पाणी पुरवठा, पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर

  • मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी मतदारांची भूमिका ठरणार महत्त्वाची

राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान

अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के, नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के, सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT