Radhika Kheda 
लोकसभा २०२४

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

अयोध्येत रामाचं दर्शन घेऊन आल्यानंतर माझा छळ सुरु झाला असा आरोपही यावेळी राधिका खेरां यांनी केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांनी रविवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले. यांपैकी भारत जोडो न्याय यात्रेचा अनुभव सांगताना आपल्याला एका खोलीत डांबून दारु पिण्याची ऑफर देण्यात आली तसेच नशेत धुंद कार्यकर्ते माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. (Radhika Kheda makes a serious allegation on Congress after quitting party)

काँग्रेसला रामराम केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राधिका खेरा म्हणाल्या, "भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसच्या छत्तीसगडच्या मीडिया सेलचे अध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांनी मला दारु पिण्याची ऑफर दिली. तसेच काँग्रेसच्या ५ ते ६ कार्यकर्त्यांनी दारुच्या नशेत माझा दरवाजा वाजवत होते. याची खबर मी सचिन पायलट आणि जयराम रमेश यांना दिली पण त्यावर पुढे काहीही घडलं नाही"

दरम्यान, पुढे आरोप करताना खेरा यांनी म्हटलं की, ३० तारखेच्या संध्याकाळी मी सुशील आनंद शुक्ला यांना काँग्रेसच्या कार्यालयात भेटायला गेलेतर त्यांनी मला शिवीगाळ केली आणि माझ्यावर ओरडले. त्यानंतर त्यांनी मला कार्यालयात डांबून ठेवलं आणि त्यांच्यासह इतर दोन प्रवक्त्यांनी मला शिविगाळ केली. मी ओरडत राहिले पण माझ्या मदतीला कोणीही आलं नाही. याची मी काँग्रेसच्या महामंत्रींकडे तक्रारही केली पण माझ्या तक्रारीकडं लक्ष द्यायला कोणाकडंही वेळ नव्हता. (Latest Marathi News)

मी कायम ऐकलं होतं की, काँग्रेस पक्ष हा रामविरोधी, सनातनविरोधी आणि हिंदूविरोधी पक्ष आहे पण मी यावर कधीही विश्वास ठेवला नाही. महात्मा गांधी आपल्या प्रत्येक बैठकीची सुरुवात 'रघुपती राघव राजाराम' या भजनानं करत होते. पण जेव्हा मी अयोध्येतील राम मंदिराला माझ्या आजीसोबत भेट द्यायला गेले दर्शन घेऊन परत आले. (Marathi Tajya Batmya)

तसेच माझ्या घराच्या प्रवेशद्वारावर मी जयश्रीरामाचा झेंडा लावला त्यानंतर काँग्रेस पक्षानं माझा तिरस्कार करायला सुरुवात केली. जेव्हा मी राम मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत होते तेव्हा माझ्यावर चिडले तसेच मी निवडणुका सुरु असल्यानं मी अयोध्येला भेट का दिली? असं मला विचारलं गेलं, असा आरोपही यावेळी खेरा यांनी केला.

राधिका खेरा यांनी यावेळी असंही म्हटलं की, "मी काँग्रेस पक्षाला माझ्या जीवनातील २२ वर्षे दिलीत. तसेच एनएसयुआयपासून मीडिया विभागापर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. पण राम मंदिराला मी पाठिंबा दिल्यानं मला प्रचंड प्रमाणावत विरोध झाला"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT