Sharad Pawar Esakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar : फसविणाऱ्यांना मतदानाद्वारे बाहेर करा! शरद पवार यांचे भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत आवाहन

सत्ताधाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली होती. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी, बेरोजगार तरुण यांना आश्वासने दिली. मात्र, ती पूर्ण केली नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशाची आजची अवस्था मोठ्या प्रमाणात बदलण्याची गरज आहे. आपण सर्व मिळून हा बदल घडवून आणू शकतो. ज्या लोकांनी देशाला वेगवेगळी आश्वासने देऊन फसवले. त्यांना आपल्याला मतदानाद्वारे बाहेर करावे लागेल, असा हल्लाबोल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला. भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला त्यांच्यासह ‘इंडिया’तील नेत्यांनी संबोधित केले.

ते म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली होती. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी, बेरोजगार तरुण यांना आश्वासने दिली. मात्र, ती पूर्ण केली नाहीत. जे लोक आश्वासने देतात पण पूर्ण करत नाही, त्यांना दूर केले पाहिजे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त आपल्याला ही संधी मिळाली आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, की टीव्हीवर आपण दररोज एक खोटी गोष्ट ऐकली आहे. मोदींची गॅरंटी. ही गॅरंटी चालणारी नाही. आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आम्ही आयोगाचे आभार मानत असल्याचे पवार यांनी सांगताच एकच हशा पिकला. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महात्मा गांधी यांनी मुंबईत ‘छोडो भारत, छोडो हुकूमत’चा नारा दिला होता. आता याच शहरात ‘छोडो भाजप’ आणि ‘भाजपसे मुक्ती’ असा नारा देत निर्धार केला पाहिजे.

एकत्र किंवा स्वतंत्र लढू - ॲड आंबेडकर

लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र लढू किंवा स्वतंत्र लढू, पण लढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘वंचित’ ही महाविकास आघाडीत सहभागी होणार की स्वतंत्र लढणार याबाबत मात्र प्रश्न निर्माण झाला आहे. ते म्हणाले, की देशात अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्या उत्पन्नापेक्षा देणग्याच अधिक आहेत.

यात फ्युचर गेमिंग या कंपनीचे उत्पन्न २०० कोटी असून त्यांनी १,३६८ कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बाँड्सची खरेदी केली आहे. याबाबत आपण मोदींना विचारणार आहोत की नाही, असा प्रश्न त्यांनी केला. परिवार वादाला लोक वैतागले आहेत. त्यामुळे स्वच्छ चारित्र्याचे, त्याच त्या समाजातील उमेदवार न देता सर्वांना समान संधी द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT