lok sabha election sakal
लोकसभा २०२४

लक्षवेधी लढत: लालुप्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला

सोनपूर यात्रेमुळे प्रसिद्ध असलेल्या बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या(आरजेडी) उमेदवार रोहिणी आचार्य यांच्यामुळे लालूप्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अजय बुवा

सारण (बिहार) : सोनपूर यात्रेमुळे प्रसिद्ध असलेल्या बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या(आरजेडी) उमेदवार रोहिणी आचार्य यांच्यामुळे लालूप्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे विद्यमान खासदार राजीव प्रताप रुडी आणि रोहिणी आचार्य यांच्या थेट लढतीमध्ये येथील जातकेंद्रीत राजकारणातील फॉरवर्ड – बॅकवर्ड (राजपूत विरुद्ध यादव) हा संघर्ष निर्णायक ठरणार आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवातही याच भागातून झाली होती. हा पूर्वीचा छपरा लोकसभा मतदारसंघ होता. २००८ मध्ये त्याचे सारण मतदारसंघ असे नामकरण झाले. १९७७ मध्ये लालूप्रसाद यांनी छपरा मधून निवडणूक जिंकली होती. यावेळी त्यांनी कन्या रोहिणी आचार्य यांना सारण मधून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. दुसरीकडे, भाजपचे नेते आणि या भागातील प्रमुख राजपूत चेहरा म्हणून ओळखले जाणारे राजीव प्रताप रुडी हे देखील छपरामध्ये १९९६, १९९९ मध्ये जिंकले होते. त्यानंतर २०१४ पासून ते सारणचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सारणमध्ये यादव आणि राजपूत समुदायाची तुल्यबळ लोकसंख्या लक्षात घेता निवडणूक नेहमीच जातकेंद्रीत होत आली आहे. साहजिकच आताही सारणमध्ये विकासाचा मुद्दा चर्चेत असला तरी राजपूत विरुद्ध यादव अशी येथील लढतीची वाटचाल सुरू झाली आहे. लालूंच्या आजारपणाच्या काळात रोहिणी आचार्य यांनी त्यांचे मूत्रपिंड लालू यांना दिले होते. त्या भावनिक मुद्द्यावरही रोहिणी आचार्य यांचा प्रचार होत आहे. येथील निवडणूक लालू केंद्रित असल्याने भाजपकडून लालूंच्या सत्ताकाळातील जंगलराजचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT