गडचिरोली : देशात पुन्हा सत्तेत आल्यावर भाजप संविधान बदलेल अशा आवई विरोधी पक्ष उठवत राहतात. पण ही निव्वळ अफवा आहे, असे सांगत सेंट्रल विस्टामध्ये संविधान ठेवून त्यापुढे नतमस्तक होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे काय संविधान बदलतील, असा प्रतिप्रश्न रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विचारला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली जनकल्याणाची कामे बघता यंदा ४०० पार आकडा गाठणे भाजप व महायुतीसाठी अजिबात अवघड नाही असेही ते म्हणालेत.
मंगळवार (ता. ९) महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ गडचिरोलीत दाखल झाल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परीषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री पीकविमा योजना, गरीबांना मोफत धान्य, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार, अशा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे ते देशातील लोकप्रिय पंतप्रधान आहेत.
आता आम्ही लक्षद्विपमध्येही पक्ष संघटन बांधणार आहोत. खासदार अशोक नेते यांनी आपल्या खासदारकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने विकासकामे केली असून हा विकासाचा वेग कायम राखण्यासाठी त्यांनाच निवडून द्यावे, असेही ते म्हणाले. या पत्रकार परीषदेला महायुतीचे उमेदवार अशोक नेते, आमदार डाॅ. देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अॅड. जनबंधू, प्रदीप आगलावे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.