Ramraje Naik-Nimbalkar vs Ranjitsingh Naik-Nimbalkar esakal
लोकसभा २०२४

रणजितसिंहांच्या उमेदवारीला रामराजेंचा विरोध; माढा मतदारसंघाचा तिढा कायम, अजितदादा-फडणवीसांच्या बैठकीत तोडगा नाहीच!

सध्या माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

रामराजेंनी व्हॉटसॲप स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे म्हटले आहे.

सातारा : माढा मतदारसंघात (Madha Constituency) भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने फलटणचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर नाराज असून, त्यांनी वेगळी भूमिका घेत या उमेदवारीला विरोध केला आहे. रामराजेंची समजूत काढण्यासाठी काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही.

महायुतीचा धर्म पाळावा, या फडणवीसांच्या सूचनेला रामराजेंनी (Ramraje Naik-Nimbalkar) विरोध करत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी व समविचारी नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईन, असे सांगितले. त्यामुळे माढ्याचा तिढा बैठकीनंतरही कायम राहिला आहे. माढा मतदारसंघाबाबत महायुतीत निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर बैठक झाली.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar), आमदार जयकुमार गोरे, संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटणचे माजी नगरसेवक अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते. सध्या माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. भाजपने जरी उमेदवारी जाहीर करून मार्ग मोकळा झाला, असे सांगितले असले तरी रामराजे निंबाळकर यांनी या उमेदवारीला विरोध केला आहे, तसेच ही उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे खासदार निंबाळकर व आमदार गोरे यांनी माढा लोकसभेतील विविध विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळविण्यास सुरुवात केली होती. यानंतर रामराजे यांनी मोहिते पाटलांची भेट घेऊन वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माढा मतदारसंघात महायुतीतच वाद पेटला होता. यावर तोडगा काढण्यासाठी संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते -पाटील यांच्याशी चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढला; पण रामराजे निंबाळकर आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले होते. त्यामुळे हा वाद शमविण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महायुतीतील नेत्यांची बैठक झाली.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस रामराजे निंबाळकर, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते. बैठकीत देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांनी रामराजेंना महायुतीचा धर्म पाळावा, अशी सूचना केली. त्यावर रामराजेंनी मी याबाबत माझ्या स्थानिक कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन, असे सांगितले.

यावरून माढा मतदारसंघातील तिढा सुटला, अशी अफवा काहींनी पसरवली होती. त्यावर रामराजेंनी व्हॉटसॲप स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे म्हटले आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

‘तो’ स्टेटस बनावट...

माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर दोघेही फलटणला येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहोत. युती धर्म पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तूर्तास इतकेच, असा आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव असलेला स्टेटस काही व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाला. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती; परंतु हे स्टेटस फेक असल्याचे समोर आले. मात्र, आचारसंहिता सुरू असताना अशाप्रकारचा स्टेटस कोणी तयार केला व तो प्रसारित केला, याचा शोध लागायला हवा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT