rashmi barve  Sakal
लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : रश्मी बर्वेंची जात पडताळणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

रश्मी बर्वे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या जात पडताळणीचा मुद्दा उपस्थित झाला होता. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. बुधवारी सुनावणी झाली. कोर्टाने सरकारवरही ताशेरे ओढले.

संतोष कानडे

Ramtek loksabha 2024 : रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष परवानगी याचिका दाखल केली.

आता ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असल्याने रश्मी बर्वेंच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जात पडताळणीचं प्रकरण समोर आलेलं होतं.

रश्मी बर्वे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या जात पडताळणीचा मुद्दा उपस्थित झाला होता. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. बुधवारी सुनावणी झाली. कोर्टाने सरकारवरही ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी बर्वे यांच्यासाठी उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवण्याची गरज आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सामाजिक न्याय विभागाकडून माझ्यावर करण्यात येत असलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत केला होता.

नागपूर खंडपीठाने ४ एप्रिल रोजी रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. परंतु, लोकसभा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार देत उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली. त्यामुळे आता रश्मी बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

Latest Maharashtra News Updates : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा, ४५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT