Ratnagiri Sindhudurg Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Narayan Rane : तीन मंत्री, दोन आमदारांवर राणेंची मदार; सिंधुदुर्गातील वाढीव टक्का कोणाच्या पथ्थ्यावर?

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीच्या प्रचारात संविधान बदलासाठी चारशे पारचा भाजपचा नारा असल्याची टीका करण्यात आली होती.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेला निष्ठावंताची साथ किती मिळणार यावर आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या मतांचे गणित अवलंबून आहे, तर महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाजूने महायुतीच्या तीन मंत्र्यासह दोन आमदारांची ताकद उभी आहे. प्रत्यक्ष मतदानावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेले अधिकचे मतदान राणेंच्या पथ्थ्यावर पडू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का अधिक मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा बालेकिल्ला म्हणूनच सिंधुदुर्गची ओळख आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघात ६६ टक्केच्या पुढे मतदान झाले आहे. राणेंना मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, राजन तेली, प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची साथ मिळाली आहे.

आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याकडे एकमेव शिलेदार आमदार वैभव नाईक यांची ताकद होती. वाढलेला मतदानाचा टक्का निश्‍चितच सत्ताधारी पक्षाला उपयुक्त ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील मतांचा टक्का कमी आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान असून युतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्याकडे बोट दाखवले जात आहे.

रत्नागिरी आणि लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघात ६० टक्केच्या दरम्यान मतदान झाले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लांजा-राजापूरमध्ये आमदार राजन साळवी यांच्याबरोबर विधानसभेला इच्छुक असलेले काँग्रेसचे अविनाश लाड यांनी आघाडीचे उमेदवार राऊत यांच्यासाठी मतदारांची ताकद उभी केली आहे. महायुतीकडून प्रचारात सर्वाधिक जोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यशस्वी चेहरा, काश्मीरमधील हटवलेले ३७० कलम, अयोध्येतील राम मंदिर यासह सीएए लागू करण्याचा मुद्दा लोकांपुढे मांडण्यात आला.

महाविकास आघाडीच्या प्रचारात संविधान बदलासाठी चारशे पारचा भाजपचा नारा असल्याची टीका करण्यात आली होती. कोकण किनारपट्टी सीडकोच्या ताब्यात देण्याची भीती यासह रिफायनरी प्रकल्पावरून राळ उठवण्याचा प्रयत्न झाला. मागील वेळेप्रमाणेच मतदानाचा प्रतिसाद राहिला. त्यामध्ये चाकरमान्यांची उपस्थित लक्षणीय नव्हती अशी चर्चा होती. पाचही विधानसभा मतदारसंघातील शहरी भागात तरुण, महिला, उच्चशिक्षित यासह मोहल्ल्यामध्ये मतदानासाठी प्रचंड गर्दी झाली. तुलनेत ग्रामीण भागात टप्प्याटप्प्याने मतदान झाले. त्यामुळे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील बहुसंख्य मतदारांचा टक्का महायुतीला पोषक तर ग्रामीण भागातील मतांचा टक्का हा आघाडीला पोषक राहण्याची दाट शक्यता आहे.

मतदानाची आकडेवाडी

  • रत्नागिरी जिल्हा ४ लाख ६८ हजार १९९

  • सिंधुदुर्ग जिल्हा ४ लाख ३८ हजार ९१९

  • दोन्हीतील फरक ३० हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT