लोकसभा २०२४

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

संतोष कानडे

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी 'शांतता राजकारण चालू आहे' या सदरात 'सकाळ'च्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी राऊतांची मुलाखत घेतली.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही तुम्ही ठाकरेंची साथ का सोडली नाही, या प्रश्नाच्या उत्तरात राऊत म्हणाले की, आमची निष्ठा स्व. बाळासाहेबांशी आहे. त्यांनी मला शाखाप्रमुख केलं, आमदार केलं नंतर खासदार केलं. सोबत उद्धव साहेबांचा आशीर्वाद नसता तर एवढं मोठं होता आलं नसतं. माझ्यावर आई-वडिलांचे, बाळासाहेबांचे संस्कार आहेत. मी जर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तर नरकातसुद्धा जागा मिळणार नाही.

राऊत पुढे म्हणाले की, कोकणातला माणूस सुज्ञ आहे, अभ्यासू आहे.. धनुष्यबाण केल्याचं दुःख आहेच, परंतु ज्या पद्धतीने गद्दारांनी धनुष्यबाण चोरुन नेला त्याची जाणीव कोकणातल्या लोकांकडे आहे. त्यामुळे मशाल चिन्ह पोहोचवण्याची अडचण नाहीये.

बारसु प्रकल्पाच्या विरोधातील भूमिकेवर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, कोकणचं सौंदर्य, कोकणचा ऱ्हास करणारा विकास असता कामा नये. काजू, मासळी, बांबू, आंबा हे उपजीविकेचं साधण आहे. प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोयत. कोकणला पूरक ठरतील, असे उद्योग आम्हाला हवे आहेत. पर्यटनाशी संबंधित विकास गरजेचा आहे.

राऊत पुढे म्हणाले, कोकणातील जमिनी लाटण्याचं काम सध्या सुरु आहे. शेकडो हेक्टर जमीन अदाणींनी खरेदी केली आहे. याशिवाय परप्रांतीय लोक येथे किनारपट्टीवर जमिनी खरेदी करत आहेत.

सी वर्ल्डच्या नावाखाली नारायण राणेंनी १ हजार ३०५ एक्कर जमीन खरेदी करण्याचं ठरवलं. जगातले सगळे सी वर्ल्ड साडेतीनशे एक्करमध्ये असताना जास्तीची जमीन घेण्याचा घाट घातलाजात होता. उर्वरित जमीन नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाखाली घेण्याचं ठरलं होतं, त्यामुळे विरोध केल्याचं विनायक राऊतांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT