Rupali Chakankar Esakal
लोकसभा २०२४

अजित पवार यांचे नेतृत्व व महिला संघटन हीच ताकद

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना कठीण परिस्थितीत महिलांचे संघटन मजबूत करणाऱ्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

सदानंद पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना कठीण परिस्थितीत महिलांचे संघटन मजबूत करणाऱ्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या चाकणकर यांच्याशी केलेली बातचीत.

आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीतील स्थिती कशी आहे?

रूपाली चाकणकर : राज्यातील लोकांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास आहे. सत्तेत राहून सामान्य माणसांसोबतचा कनेक्ट ठेवून काम करण्याची पद्धत राष्ट्रवादीने विकसित केली आहे. हे यश राज्यातील फार कमी पक्षांना मिळाले असेल. सामान्य माणसाच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांसाठी झटणारा पक्ष म्हणून परिचित आहे, त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक सोपी आहे.

काम हवे की भावनिक आवाहन हवे, यातून कामाची निवड लोक करतील यावर आमचा विश्वास आहे. अजित पवार यांच्यासारखे नेतृत्व सोबत असल्याने आमच्या कार्यकर्त्यांसोबतच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह आहे. मोठ्या ताकदीने महायुतीतील पक्ष काम करत आहेत.

तुमच्या पक्षाची ताकद कशात आहे?

- अजित पवार यांच्यासारखे धडाडीचे आणि विकासासाठी झटणारे नेतृत्व ही आमच्या पक्षाची ताकद आहे. राज्यभरातील तरुण कार्यकर्त्यांसाठी अजित पवार हे राजकारणातील रोल मॉडेल आहेत. त्यांची धडाडी, त्यांचा स्पष्टवक्तेपणा, दिलेल्या शब्दाला जागणे आणि पक्ष-गट-तट याचा विचार न करता विकास कामे करण्याची वृत्ती यामुळे सर्व थरांत त्यांना मान्यता आहे. याशिवाय राज्यातील सर्वात मोठे महिला संघटन आज आमच्या पक्षाकडे आहे.

या महिला अजित पवार यांचे लोकाभिमुख नेतृत्व पाहून आलेल्या आहेत. महिला आयोगाच्या माध्यमातून आम्ही सर्व थरांतील महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. महायुतीच्या सरकारनेही महिलांसाठी अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या आहेत. त्यामुळे एकूण मतदारांमध्ये पन्नास टक्के असलेली स्त्रीशक्तीची आमच्यासोबत आहे.

तुम्ही अजित पवार गटात का गेलात ?

- अजित पवार यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अधिकची ताकद मिळते आहे. महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी सत्तेत सहभागी झालो. २००२ साली पुणे महापालिका निवडणुकीमध्ये माझ्या सासूबाईं रुक्मिणीनानी चाकणकर यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली आणि सासूबाई निवडून आल्यानंतर प्रभागातील विकासकांमासाठी सर्वाधिक निधीही दादांच्या माध्यमातून मिळाला.

आमचे राजकारण सुरू झाले ते अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळे. त्यांनी सांगितले म्हणूनच २००९ साली पक्षातील कोणतेही पद माझ्याकडे नसताना माझ्या बचत गटातील हजारो महिलांना बरोबर घेऊन लोकसभेला सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. माझ्या प्रभागातून सर्वाधिक मतदान त्यावेळी आम्ही दिले. पक्षासाठी अनेक आंदोलने केली, वेळप्रसंगी अटक झाली, त्या काळात अजित पवार यांनी लढणा-या कार्यकर्त्यांना साथ दिली.

तुम्ही बारामतीच्या प्रचारात सुरुवातीपासून सक्रिय आहात...

- बारामतीमधून सुनेत्रा पवार आमच्या पक्षाच्या उमेदवार आहेत. सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विकासकामांमध्ये मोठे योगदान दिलेआहे. आजवर त्यांनी कधी आपल्या कामाचा प्रचार केला नाही, परंतु विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे.

अजित पवार राज्य पातळीवर काम करत असताना तीन दशकांहून अधिक काळ त्या स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. ग्रामविकास, पर्यावरण, आरोग्य या क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे. अनेक आरोग्य शिबिरे घेऊन गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

ग्रामविकासाच्या क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी काही महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्यासारखी एक संयमी, कर्तबगार महिला संसदेत गेली पाहिजे, असे मला वाटते. आम्हाला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असून अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांना बारामती लोकसभा मतदार संघातील जनता नक्की पाठबळ देईल, याची खात्री वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT