Sangli Lok Sabha Ajit Pawar vs Congress leader Vishal Patil esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : कारखाना चालवता येईना अन् निघालाय खासदार व्हायला; अजितदादांनी विशाल पाटलांना हाणला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत देशाचे व्हिजन ठेवून काम केले. जगभरात देशाचा गौरव वाढवला.

सकाळ डिजिटल टीम

''संजय पाटील यांची हट्‌ट्रिक पक्की आहे. तुम्ही किती मोठा रेकॉर्ड करताय हेच बघायचं आहे.’’

सांगली : वसंतदादांनी चांगले कारखाने काढले. महाराष्ट्रात फिरत असताना आम्ही सांगलीच्या कारखान्याचे उदाहरण देत होतो; पण कारखान्याचे वाटोळे कुणी केले. तुमच्यात धमक नाही. बँकेची स्थिती काय, असा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विशाल पाटील (Vishal Patil) यांना लक्ष्य करत ‘तुम्हाला कारखाना चालवता येत नाही अन् निघालाय खासदार व्हायला’ असा टोला हाणला.

ही गल्लीतील निवडणूक नाही, तर दिल्लीतील आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. सांगलीतील स्टेशन चौकात महायुतीचे उमेदवार भाजपचे खासदार संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित प्रचार प्रारंभ सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत देशाचे व्हिजन ठेवून काम केले. जगभरात देशाचा गौरव वाढवला. ही निवडणूक गावकी भावकीची नसून, १४० कोटींच्या लोकसंख्येच्या देशाचा नेता निवडण्याची आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भांड्याला भांडे लागले असेल; पण आता देशाची निवडणूक आहे, मतभेद बाजूला ठेवून काम करा.’’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘दस साल, ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. ही निवडणूक गल्लीतील नाही, दिल्लीतील आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. सांगली, सातारा, सोलापूर या दुष्काळी भागात विविध सिंचन प्रकल्पांना हजारो कोटी रुपये दिले आहेत. या तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळाचा इतिहास पुसून काढण्याचे आमचे स्वप्न आहे. नरेंद्र मोदींनी प्रत्येक घटकाला मदत केली आहे. नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे देशातील कारखानदारी जिवंत राहिली आणि शेतकऱ्यांना एफआरपीसुद्धा मिळाली. मोदींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे, घटक पक्षांचे डबे आहेत, ज्यामध्ये सामान्य लोकांना बसण्याची जागा आहे. विरोधकांच्या आघाडीला डबे नाहीत, फक्त इंजिन आहे.’’

पालकमंत्री खाडे म्हणाले, ‘‘काँग्रेसचा एक नेता म्हणाला, देशात राहुल गांधी आहेत, तोपर्यंत मोदींना चांगले दिवस आहेत आणि सांगलीत विशाल आहेत, तोपर्यंत काकांना चांगले दिवस आहेत. त्यामुळे संजय पाटील यांचा विजय निश्‍चित आहे.’’ यावेळी त्यांनी वीजनिर्मितीचे ११ टीएमसी पाणी टंचाईसाठी राखून ठेवण्याची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘भारत विरुद्ध इंडिया अशी ही लढाई आहे. इंडियाने शेतकऱ्यांना लुटले आहे. आता यांना रोखायला हवे.’’

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत रडारडी सुरू आहे. शरद पवार यांचे वय झाले, उद्धव यांचे सगळे लोक गेलेत. दोघांनाही आधार देऊन उभे करायचे आहे. विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा विरोधकांकडे होत नाही. आपल्या जिल्ह्याला भाजपने, मोदींनी खूप मोठा निधी दिला आहे. शेताच्या बांधापर्यंत पाणी दिले आहे. इंडिया आघाडीचा मेळ होऊ शकला नाही. समोरच्या गटाकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आणि हे म्हणतात, आमची सत्ता येणार आहे.’’

शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी स्वागत केले. पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी आभार मानले. आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्यचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे, निशिकांत पाटील, संग्राम देशमुख, इद्रिस नायकवडी, दिनकर पाटील, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, दीपक शिंदे, समित कदम, राजेंद्रअण्णा देशमुख, नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, वैभव पाटील, पृथ्वीराज पवार, पद्माकर जगदाळे, भगवानराव साळुंखे, सुहास बाबर, नीता केळकर, संगीता खोत, गीतांजली ढोपे-पाटील, स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.

मनात शंका बाळगू नका - सुहास बाबर

सुहास बाबर श्री. फडणवीस यांना म्हणाले, ‘‘अनिल भाऊंनी टेंभूचे वास्तव सांगितल्यानंतर तुम्ही अनुशेष सोडून खानापूर आटपाडीला मदत केलीत. त्याची उतराई म्हणून आम्ही खानापूर आटपाडीतून मताधिक्य देऊ. त्यामुळे मनात शंका बाळगू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यासाठी प्रोटोकॉल मोडला जातोय, लहान असून सन्मान दिला जातोय. यावर देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही अनिल भाऊंचे प्रतिनिधी म्हणून बोलत आहात, असे सांगितले.

संजय पाटील यांची हॅट्‌ट्रिक पक्की!

हमारे पास भी पैलवान है, पैलवान संजय पाटील... असे म्हणत सभेस उपस्थितांची गर्दी पाहून श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘तुमचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीही शंका उरलेली नाही. संजय पाटील यांची हट्‌ट्रिक पक्की आहे. तुम्ही किती मोठा रेकॉर्ड करताय हेच बघायचं आहे.’’

नाराज पृथ्वीराज देशमुखांची उपस्थिती

खासदार संजय पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आजच्या सभेला त्यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, ‘‘महायुतीच्या माध्यमातून एकसंधपणे लढत आहे. आमचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील.’’

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते इद्रिस नायकवडी यांनी मिरज पॅटर्नचा पंचनामा केला. ते म्हणाले, ‘‘परवा झालेल्या राजकीत तमाशात मिरज पॅटर्न दाखवतो, असे धंदा पाण्यासाठी फिरणाऱ्यांनी सभेत सांगितले. तुम्ही जन्माला आला नव्हता तेव्हा हा पॅटर्न निर्माण झाला. वसंतदादा पाटील चारवेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर मिरजकरांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्याचे ठरले. सांगलीत वसंतदादांना भेटायला मिरजेचे नगरसेवक गेले, तेव्हा वसंतदादा म्हणाले, ‘‘तुमचा ठराव होऊ दे, नंतर पाहू. मात्र याच नगरसेवकांनी एका रात्रीत वसंतदादांचा सत्कार करण्याचा ठराव रद्द केला. याला म्हणायचे मिरज पॅटर्न.’’

जनसुराज्यची रॅली

महायुतीच्या सभेसाठी जनसुराज्य पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सभास्थळ असलेल्या स्टेशन चौकापर्यंत तरुणांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. खासदार संजय पाटील यांचे सभास्थळी उघड्या गाडीतून नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत आगमन झाले. त्यांचे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात येत होते. सभास्थळी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह होता. धनगरी ढोल, ताशा यांच्या वादनाने चांगलाच उत्साह निर्माण केला होता.

कवलापूर विमानतळ करा - संजय पाटील

उमेदवार संजय पाटील म्हणाले, ‘‘जनतेने दहा वर्षे लोकसभेत काम करण्याची संधी दिली. लोक माझ्यासोबत असल्याने मी विजयाची हट्‌ट्रिक करेन याबाबत विश्वास आहे. मी मोदींचा सैनिक, मोदी परिवाराचा घटक आहे. सिंचन योजनेसाठी निधी आणला. विस्तारित टेंभू म्हैसाळची कामे मार्गी लागली आहेत. सलगरे येथील ड्रायपोर्टसाठी तत्त्वतः मंजुरी मिळालेली आहे. उडान दोनमधून कवलापूर येथे विमानतळ होण्यासाठी मागणी केली. ज्यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज भरला, ते बाळ लहान असल्यापासून मी त्याला बघतोय, राजकारणात परिपक्व नसलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघतोय, अशा शब्दांत त्यांनी विशाल पाटील यांचा समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT